दिवाळीमुळे रेल्वेगाड्यांना मोठी गर्दी, मध्य रेल्वेने घेतला महत्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 12:03 PM2022-10-13T12:03:37+5:302022-10-13T12:45:13+5:30

दिवाळी सुट्ट्यांमुळे रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाले

For the convenience of railway passengers, temporary additional bogies will be added to the four express trains running through Miraj | दिवाळीमुळे रेल्वेगाड्यांना मोठी गर्दी, मध्य रेल्वेने घेतला महत्वाचा निर्णय

संग्रहित फोटो

googlenewsNext

मिरज : दिवाळी सणादरम्यान रेल्वेगाड्यांना मोठी गर्दी असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी मिरजमार्गे धावणाऱ्या कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेससह पुण्यातून सुटणाऱ्या चार एक्स्प्रेस गाड्यांमध्ये तात्पुरत्या अतिरिक्त बोगी जोडण्यात येणार आहेत.

क्रमांक ११४०४ दर सोमवारी व शुक्रवारी कोल्हापुरातून सुटणाऱ्या कोल्हापूर-नागपूर द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेसला एक अतिरिक्त एसी थ्री व स्लीपर कोच १७ ऑक्टोबर ते ०४ नोव्हेंबर या काळात व प्रत्येक मंगळवारी व शनिवारी नागपूरहून सुटणाऱ्या क्रमांक ११४०३ नागपूर कोल्हापूर द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेसला दि. १८ ऑक्टोबर ते ०५ नोव्हेंबर या कालावधीत जादा बोगी जोडण्यात येणार आहेत.

याशिवाय दर गुरुवारी पुण्याहून सुटणाऱ्या पुणे-नागपूर साप्ताहिक एक्स्प्रेस, दर शुक्रवारी नागपूरहून सुटणाऱ्या नागपूर-पुणे साप्ताहिक एक्स्प्रेस, दर शनिवारी पुण्यातून सुटणाऱ्या पुणे अजनी साप्ताहिक एक्स्प्रेस व अजनी-पुणे साप्ताहिक एक्स्प्रेस व नागपूर-पुणे त्रिसाप्ताहिक गरीबरथ एक्स्प्रेसला अतिरिक्त दोन एसी थ्री बोगी जादा बोगी असतील. दिवाळी सुट्ट्यांमुळे रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांना जादा बोगी जोडण्यात येत असून प्रवाशांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन मध्य रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: For the convenience of railway passengers, temporary additional bogies will be added to the four express trains running through Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.