मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ग्रामीण भागातही साहित्य संमेलन होणं गरजेचं - आप्पासाहेब खोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2022 03:28 PM2022-03-13T15:28:17+5:302022-03-13T15:28:36+5:30
मराठी भाषेचे पहिले विद्यापीठ मुबई येथे उभे करणार असून त्यासाठी मुबई महानगरपालिकाने जागा दिली आहे.
देवराष्टे - ग्रामीण भागात साहित्य संमेलन होणे ही काळाची गरज आहे त्यातूनच लिहा त्यांना बळ मिळेल मराठी भाषेचे संवर्धन हे समाजात जनजागृती होऊन नवीन पिढी घडेल यासाठी गावोगावी साहित्य संमेलन भरले पाहिजेत असे मत 32 व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अप्पासाहेब खोत यांनी व्यक्त केले.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर व ग्रामपंचायत देवराष्टे यांच्या संयुक्त विद्यमाने 32 वे दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन देवराष्टे येथील श्री यशवंतराव चव्हाण सास्कृतीक भवन येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मकांत देशमुख, स्वागताध्यक्ष विश्वजित कदम मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आप्पासाहेब खोत यांनी विविध विषयांवर मार्गदर्शक केले मराठी ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी प्रयत्न केले होते अनेक साहित्यिकांनी मराठी साहित्य मध्ये मोलाची भर घातली असून ही परंपरा पुढे चालू राहिली पाहिजे. ग्रामीण जीवन एका नव्या वळणावर उभा राहिले आहे त्यामध्ये राजकारण ,समाजकारण, बदलते जीवन शैली, दारिद्र्य ,याचा सहभाग असावा आजचा युवक टीव्ही, मोबाईल ,राजकारण यात अडकून पडला आहे काही ठीकाणी पर्याय नाही म्हणुन शेती मध्ये अडकून पडला आहे या सर्व विषयांवर नवोदित लेखकांनी त्यांनी लिखाण केले पाहिजे
शासनाने सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा केला पाहिजे तरच भाषेची व भाषेबरोबर संस्कृती जतन होईल माणसातील लेखक जिवंत राहिला पाहिजे यासाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेऊन साहित्य संमेलने ,संवाद ,चर्चासत्रे घेतली पाहिजे फक्त मराठी भाषेत एच कथाकथन सांगितले जात त्यामुळे ही कला मी कायम जपणार आहे मरेपर्यंत कथाकथनकार ही बिरुदावली ही अभिमानाने छातीवर मिरवणार आहे
शेवटी त्यांनी एक काव्य सादर केले
मी भरून घेतो सारे,
हृदयाच्या काठोकाठ ,
पण शब्दातून देताना का ,
पाझरता होतो माठ,
शब्दातून देऊन थोडे जी उरात उरते काही ती प्रेरक शक्ती तुम्हाला मी मजला जगण्याची देते ग्वाही
यावेळी संमेलनाचे उद्घाटक लक्ष्मकांत देशमुख यांनी देखील देशातील विविध ग्रथ,पुस्तकावर मार्गदर्शन केले यावेळी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे ,डॉक्टर विनोद कांबळे डॉक्टर चंद्रकांत पोतदार ,प्राध्यापक एकनाथ पाटील, दी बा पाटील , भीमराव धुळूबुळू ,वी द कदम, सरपंच प्रकाश मोरे ,उपसरपंच सुभाष शिरतोडे ,तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप जाधव ,हिंमत पाटील ,स्वाती पवार सह मान्यवर उपस्थित होते.
राज्यात पहिले मराठी भाषेचे विद्यापीठ उभे राहणार - विश्वजीत कदम
मराठी भाषेचे पहिले विद्यापीठ मुबई येथे उभे करणार असून त्यासाठी मुबई महानगरपालिकाने जागा दिली आहे. या भव्य विदयापिठासाठी अर्थसंकल्प मध्ये निधी ची तरतुद केली आहे त्यामुळे राज्यात पहिले मराठी भाषेचे विद्यापीठ उभे राहणार असल्याचे राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केले तसेच कोल्हापुर येथे मराठी भवन उभा करणेसाठी डी पी डी सी मधुन पंचवीस लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले
ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरवात
यशवंतराव चव्हाण जन्मस्थळ ते संम्मेलन स्थळ अशी ग्रंथदिंडी काढण्यात आली. यशवंतराव चव्हाण यांच्या पुस्तकांचा ग्रंथदिडीत समावेश करण्यात आला होता. यावेळी साहित्यीक, विद्यार्थी , ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते. ग्रंथदिडीत झांजपथक , भजणीमंडळ सहभागी झाले होते.