शिरसगावच्या निर्धाराला एकीचे बळ

By admin | Published: March 30, 2017 12:42 AM2017-03-30T00:42:11+5:302017-03-30T00:42:11+5:30

पाण्यासाठी प्रयत्न : सरपंचांचा पुढाकार, परिसरातील महाविद्यालयांची साथ

Force of determination of Shirasgaon | शिरसगावच्या निर्धाराला एकीचे बळ

शिरसगावच्या निर्धाराला एकीचे बळ

Next



प्रताप महाडिक ल्ल कडेगाव
नैसर्गिक स्वरुपात उपलब्ध होणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळीत वाढ करण्याची आवश्यकता नेहमीच व्यक्त केली जाते. मात्र प्रत्यक्षात पाणी अडवा, पाणी जिरवाचा प्रकल्प राबविण्याकडे दुर्लक्ष होत आले आहे. कडेगाव तालुक्यातील डोंगरकुशीत लपलेल्या शिरसगावचे सरपंच सतीश ऊर्फ संभाजी मांडके यांनी डोंगरउताराला चरी काढून आणि डोंगरातील ओघळी जागोजागी अडवून पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे १२ महिने पाण्याचा तुटवडा भासणार नाही, या वस्तुस्थितीचे प्रत्यक्ष कृतीतून दर्शन घडविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
शिरसगाव येथील या ध्येयवेड्या सरपंचाचे प्रयत्न पाहून जवळच्या महाविद्यालयांनी शिरसगावसाठी हा दोन दिवस काम करण्याचा निर्धार केला आहे. जवळच्या ५ महाविद्यालयांतील मुले दि. १ आणि २ एप्रिल या दोन दिवसात श्रमदानातून डोंगरउताराला समतल चरी खोदणार आहेत. याशिवाय डोंगरातील ओघळी जागोजागी अडवून बंधारे घालण्यात येणार आहेत.
या सर्व ओघळी एकत्र येणाऱ्या तलावात पाणी साठविले जाणार आहे. त्यामुळे शिरसगाव शिवारात पाण्याचा तुटवडा भासणार नसल्याचा विश्वास सतीश मांडके यांना आहे. यामुळेच त्यांनी पाणी अडवाचा प्रस्ताव पुढे आणला आहे. येथे पावसाळ्यात पडणारे पाणी जमिनीत मुरून परिसरातील भूजल पातळी वाढेल. त्यामुळे पाण्याचा तुटवडा भासणार नाही.
शिरसगाव येथील ग्रामस्थांनी सरपंचांच्या आवाहनास ग्रामस्थांची साथ असल्याचे सांगितले. श्रमदानासाठी येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या तसेच स्वयंसेवी संस्थांच्या तरुणांना डोंगर परिसरात भोजन, नाष्टा, पाणी आदी सुविधा ग्रामस्थांनी केली आहे. जलसिंचनातील आदर्श काम येथे होत आहे. कोणतेही वाहन अथवा यंत्र ज्या ठिकाणी जात नाही, अशा ठिकाणी शासनाच्या मदतीशिवाय श्रमदानातून हे काम होणार आहे.

Web Title: Force of determination of Shirasgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.