Sangli News: चांदोली व्याघ्र प्रकल्पाजवळ जंगलात पुन्हा आग, औषधी वनस्पतीसह सागवान वृक्ष जळून खाक 

By श्रीनिवास नागे | Published: March 20, 2023 02:35 PM2023-03-20T14:35:36+5:302023-03-20T14:36:01+5:30

वन विभागाचे कर्मचारी संपावर असल्यामुळे वणव्याची दाहकता वाढून संपूर्ण अभयारण्य आगीत सापडण्याची शक्यता

Forest fire again near Chandoli Tiger Reserve, teak tree with medicinal plants burnt | Sangli News: चांदोली व्याघ्र प्रकल्पाजवळ जंगलात पुन्हा आग, औषधी वनस्पतीसह सागवान वृक्ष जळून खाक 

Sangli News: चांदोली व्याघ्र प्रकल्पाजवळ जंगलात पुन्हा आग, औषधी वनस्पतीसह सागवान वृक्ष जळून खाक 

googlenewsNext

शिराळा : चांदोली (ता. शिराळा) अभयारण्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पानजीक मणदूर गावच्या हद्दीत जंगलाला अचानक वणवा लागल्याची घटना घडली. यामध्ये अनेक औषधी वनस्पतीसह किमती सागवान वृक्ष जळून खाक झाले. वन विभागाचे कर्मचारी संपावर असल्यामुळे वणव्याची दाहकता वाढून संपूर्ण अभयारण्य आगीत सापडण्याची शक्यता आहे.

काल रविवारी (दि. १९) दुपारी अचानक वणवा लागल्याने परिसरातील अनेक वन्य प्राण्यांचाही जीव धोक्यात आला. दुपारच्या सुमारास हा वणवा लागल्याची घटना घडली. दरम्यान, आगीची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग मोठी असल्यानं नियंत्रण मिळवता आले नाही. अशाच पद्धतीने दि. ७ मार्चला आग लागली होती.

वन विभागाचे कर्मचारी संपावर असल्यामुळे वणव्याची दाहकता वाढून संपूर्ण अभयारण्य आगीत सापडण्याचा धोका आहे. दरम्यान, चार रोजंदार वनमजूर ही आग शमविण्यासाठी कार्यरत होते. ही आग अशीच उशिरापर्यंत सुरू राहिली तर जंगलातील अनेक झाडांचे नुकसान होऊ शकते. तसेच वन्यप्राण्यांच्या जीवालाही धोका आहे.

मानवी हस्तक्षेप कारणीभूत

एकीकडे जंगलात लागणाऱ्या आगीवर उपाययोजना करायची नाही, तर दुसऱ्या बाजूला पावसाळ्यात लाखो रुपये खर्च करून वृक्ष संवर्धन व वृक्षारोपण कार्यक्रम राबवायचा, याला काहीच अर्थ नसल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे आहेत तीच जंगले वाचविली तरी सध्या भेडसावणाऱ्या समस्या दूर होतील, तर मानवी हस्तक्षेपामुळे वणवे लागण्याचे प्रकार अधिक असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.

Web Title: Forest fire again near Chandoli Tiger Reserve, teak tree with medicinal plants burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.