गावकऱ्यांच्या धडपडीने बचावली नांगोळे येथील वनसंपदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:26 AM2021-03-26T04:26:11+5:302021-03-26T04:26:11+5:30

नांगोळे (ता. कवठेमहांकाळ ) येथे शंभर हेक्टरवरील गवताळ जमीन वणव्यामुळे बेचिराख झाली. लोकमत न्यूज नेटवर्क कवठेमहांकाळ : नांगोळे (ता. ...

The forest resources at Nangole were saved by the efforts of the villagers | गावकऱ्यांच्या धडपडीने बचावली नांगोळे येथील वनसंपदा

गावकऱ्यांच्या धडपडीने बचावली नांगोळे येथील वनसंपदा

Next

नांगोळे (ता. कवठेमहांकाळ ) येथे शंभर हेक्टरवरील गवताळ जमीन वणव्यामुळे बेचिराख झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क

कवठेमहांकाळ : नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) एका डोंगरपायथ्याला गुरुवारी दुपारी भीषण आगीने वेढले. गावकऱ्यांनी धावपळ करून आग नियंत्रणात आणली व वनराईतील हजारो झाडे वाचवली.

या परिसरात जलबिरादरी संस्था दोन वर्षांपासून वनजमिनीवर जलसंवर्धन मोहीम राबवत आहे. वन तलाव, वृक्षारोपण तसेच मियावाकी वनराई प्रकल्प उभारला आहे. या वनजमिनीपासून सुमारे आठशे मीटर अंतरावरील खासगी जमिनीवर गुरुवारी सकाळी अज्ञातांनी आग लावली. तापणारे ऊन आणि सोसाट्याचा वारा यामुळे आग काही क्षणातच भडकली. हा डोंगराळ भाग वाळलेल्या गवताचा असल्याने आगीने विक्राळ रूप धारण केले. स्थानिक शेतकरी व जलबिरादरीच्या कार्यकर्त्यांनी झाडांच्या फांद्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; पण जोरदार वारे वाहत असल्याने ती नियंत्रणात येईना.

ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांना माहिती देताच वनमजूर मदतीला धावले. कवठेमहांकाळमध्ये अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नव्हती, तसेच जॉलीबोर्डमध्ये पंप दुरुस्तीचे काम सुरू होते. शेवटी ब्लोअरच्या मदतीने आग नियंत्रणात आणली. त्यासाठी विजय गडदे, विठ्ठल मासाळ, माऊली टकले, अस्लेश वाले, राहुल हुबाले, अंकुश नारायणकर, सागर साळुंखे, बालाजी चव्हाण, हाफिज रमजान मुल्ला, यासीन जमादार, रेहान जमादार, जैद इनामदार, हाफिज शोएब, प्रवीण जमगे, विलास शिंदे, भगवान निकम आदींनी परिश्रम घेतले.

चौकट

ब्लोअरने फवारले पाणी

नांगोळे गावातील हाॅटेल व्यावसायिक हणमंत कोळेकर यांनी माहिती मिळताच औषध फवारणीचा ब्लोअर उपलब्ध केला. मित्र राकेश कोळेकर यांच्या मदतीने दुर्घटनास्थळी पाण्याने भरून पाठविला. शेतकरी, जलबिरादरीचे कार्यकर्ते, इमदाद फाऊंडेशनचे सदस्य, वनमजूर आदींनी मिळून चार तासांच्या अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत सुमारे १०० हेक्टर गवताळ जमीन जळून खाक झाली. ग्रामस्थांच्या धडपडीने वनसंपदा बचावली.

Web Title: The forest resources at Nangole were saved by the efforts of the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.