भाजपचे माजी खासदार संजयकाकांनी घेतली शरद पवारांची भेट, सांगली जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 07:28 PM2024-09-11T19:28:11+5:302024-09-11T19:29:03+5:30

दत्ता पाटील तासगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात उलतापालच सुरू असतानाच भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी राष्ट्रवादी ...

Former BJP MP SanjayKaka patil met Sharad Pawar, excitement in political circles in Sangli district | भाजपचे माजी खासदार संजयकाकांनी घेतली शरद पवारांची भेट, सांगली जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ

भाजपचे माजी खासदार संजयकाकांनी घेतली शरद पवारांची भेट, सांगली जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ

दत्ता पाटील

तासगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात उलतापालच सुरू असतानाच भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुणे येथे मोतीबागेत बुधवारी भेट घेतली. पाटील यांच्या भेटीने सांगली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या काही नेत्यांनी तत्कालीन खासदार संजय पाटील यांना लोकसभेची उमेदवारी मिळू नये यासाठी विरोध केला होता. तरीही भाजपकडून पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. निवडणुकीत भाजपमधूनच अंतर्गत विरोध झाला. त्याचा फटका माजी खासदार संजय पाटील यांना बसला. त्यामुळेच संजय पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यासह राज्यभरात मोठी उलथापालथ होत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी हातात घेण्यासाठी राज्यातील अनेक बडे नेते तयारीत असतानाच भाजपचे नेते आणि सांगलीचे माजी खासदार संजय पाटील यांनी बुधवारी पुणे येथे शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील हे भाजपकडून तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून रोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात राजकीय संघर्ष सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

अशा परिस्थितीत माजी खासदार संजय पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली असून सांगली जिल्ह्यात या भेटीने खळबळ उडाली आहे.


सांगलीतील मराठा समाज सांस्कृतिक भवन मधील  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा 4 ऑक्टोंबर रोजी सांगलीत होणार आहे. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्षपद माझ्याकडे आहे त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यासाठी शरद पवारांची पुणे येथे भेट घेतली होती. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. - संजय पाटील, माजी खासदार,

Web Title: Former BJP MP SanjayKaka patil met Sharad Pawar, excitement in political circles in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.