माजी उपाध्यक्षांचा शिक्षक संघात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:22 AM2021-01-09T04:22:48+5:302021-01-09T04:22:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष, समितीचे नेते नानासाहेब कांबळे, जतच्या कन्नडचे नेते दयानंद गिरगावकर यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष, समितीचे नेते नानासाहेब कांबळे, जतच्या कन्नडचे नेते दयानंद गिरगावकर यांनी कडेपूर (ता. कडेगाव) येथील मेळाव्यात शिक्षक संघात प्रवेश केला. संघाचे राज्य नेते संभाजीराव थोरात यांनी त्यांचे स्वागत केले. आगामी बँकेच्या निवडणुकीत संघाचा झेंडा फडकेल, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.
शिक्षक संघाचा मेळावा कडेपूर येथे पार पडला. या मेळाव्याला तहसीलदार शैलजा पाटील, गटशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, सरचिटणीस अविनाश गुरव, पार्लमेंटरी अध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी, विलास शेळके, अरुण पाटील, हंबीरराव पवार, रामचंद्र खोत, माणिकराव पाटील, धनंजय नरुले, सुधाकर पाटील, बाजीराव पाटील उपस्थित होते.
मेळाव्यात समितीचे नेते नानासाहेब कांबळे व जतचे दयानंद गिरगावकर यांनी संघात प्रवेश केला. संभाजीराव थोरात म्हणाले, नानासाहेब कांबळे यांच्यासारखा नेता संघात सामील झाल्याने त्यांचा योग्य सन्मान केला जाईल. शिक्षक बँकेच्या निवडणुकीत संघाचा झेंडा फडकणार आहे. कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागावे, असे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांचा पापाचा घडा भरला आहे. बँकेत सत्ता येताच ९ टक्के कर्जास व्याजदर व दोन अंकी लाभांश पहिल्याच सभेत मंजूर करणार आहे. सभासद हिताचा आदर्शवत असा जाहीरनामा काढला जाईल व त्यासाठी शिक्षक संघ बांधील राहील, असे सांगितले.
गोरखनाथ मोहिते यांनी प्रास्ताविक, तर खलील मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले. धनंजय नरुले यांनी आभार मानले. यावेळी जनार्धन ढाणे, सतीश गायकवाड, तुकाराम कांबळे, प्रदीप पवार, अनिस इबुसे, संजय महिंद, बाबासाहेब शिंदे, संतोष मोहिते ,नानासो शिंदे उपस्थित होते.