समित्यांचा ५0-२१-१२ चा ‘फॉर्म्युला’
By admin | Published: April 20, 2017 10:54 PM2017-04-20T22:54:58+5:302017-04-20T22:54:58+5:30
जिल्हा परिषदेच्या सभेत शिक्कामोर्तब : भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये जागावाटप; निवडी बिनविरोध
सांगली : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांना कृषी व पशुसंवर्धन समित्याच देण्यावर गुरुवारच्या विशेष सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब झाले. सभापती अरुण राजमाने यांना बांधकाम व अर्थ, तर सभापती तम्मणगौडा रवी यांच्याकडे शिक्षण व आरोग्य समित्या दिल्या आहेत. विषय समितीच्या एकूण ८३ समित्यांपैकी भाजप व मित्रपक्षांना ५०, राष्ट्रवादीला २१ आणि काँग्रेसच्या सदस्यांना १२ समित्यांचे वाटप करण्यात आले. सत्ताधारी व विरोधकांनी चर्चेतून वाटप केल्यामुळे निवडी बिनविरोध झाल्या.
बाबर, राजमाने, रवी या सभापतींना व सदस्यांना समित्यांचे वाटप करण्यासाठी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. सुहास बाबर यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन समिती देण्याचा एकमताने निर्णय झाला. बाबर यांनी उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बांधकाम व अर्थ समितीची अपेक्षा व्यक्त केली होती. भाजपमधील मिरज तालुक्यातील मालगाव गटातून विजयी झालेले अरुण राजमाने यांनीही बांधकाम व अर्थ समितीवर हक्क सांगितल्यामुळे बाबर यांचा पत्ता कट झाला. यामुळे बाबर काहीसे नाराज झाले. तरीही त्यांनी कृषी व पशुसंवर्धन समित्यांना गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न करेन, असे सांगितले.
अरुण राजमाने यांना अपेक्षेप्रमाणे बांधकाम व अर्थ समिती, तर तम्मणगौडा रवी यांना शिक्षण व आरोग्य समिती मिळाल्यानंतर त्यांनी गुरुवारपासूनच कामकाजाला सुरुवात केली आहे.
जिल्हा परिषदेचे ५४ सदस्य आणि पंचायत समित्यांचे १० सभापती अशा ६४ सदस्यांना ८३ विषय समित्यांचे वाटप करण्यात येणार होते. यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ३४ जागांची मागणी केली होती. पण, भाजपने मित्रपक्षांसह सदस्य संख्या जास्त असल्यामुळे ५० समित्यांवर दावा सांगितला होता. यामध्ये तडजोड होऊन काँग्रेस व राष्ट्रवादीला ३३ समित्या दिल्या आहेत. काँग्रेस सदस्यांना १२, तर राष्ट्रवादी सदस्यांना २१ समित्यांवर समाधान मानावे लागले. भाजपने ठरल्याप्रमाणे ५० समित्या पटकाविल्या. शिवसेना, अजितराव घोरपडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रयत विकास आघाडीच्या सदस्यांना भाजपच्या कोट्यातून समित्यांचे वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)
स्थायी समिती
संग्रामसिंह देशमुख, सुहास बाबर, अरुण राजमाने, तम्मणगौडा रवी, सुषमा नायकवडी, ब्रह्मानंद पडळकर, अर्जुन पाटील, सत्यजित देशमुख, डी. के. पाटील, किरण नवले, सुरेखा आडमुठे, सुनीता पवार, अश्विनी पाटील, संभाजी कचरे.
जलसंधारण समिती
संग्रामसिंह देशमुख, सुहास बाबर, अरुण राजमाने, तम्मणगौडा रवी, सुषमा नायकवडी, ब्रह्मानंद पडळकर, विक्रम सावंत, चंद्रकांत पाटील, आशाराणी पाटील, स्नेहलता जाधव, प्राजक्ता कोरे, सुरेखा जाधव.
अर्थ समिती
अरुण राजमाने, जितेंद्र पाटील, सतीश पवार, मनोहर पाटील, प्रमोद शेंडगे, रेश्मा साळुंखे, मंगल जमदाडे, डी. के. पाटील, शिवाजी डोंगरे.
शिक्षण समिती
तम्मणगौडा रवी, शारदा पाटील, स्नेहलता जाधव, सुरेंद्र वाळवेकर, सुलभा अदाटे, सुनीता जाधव, शांता कनुजे, शरद लाड, संध्या पाटील.
बांधकाम समिती
अरुण राजमाने, अश्विनी पाटील, संजीव पाटील, जयश्री पाटील, अरुण बालते, आशा पाटील, जगन्नाथ माळी, शिवाजी डोंगरे, सरदार पाटील.
आरोग्य समिती
तम्मणगौडा रवी, वैशाली कदम, भगवान वाघमारे, संगीता पाटील, मनीषा बागल, रेश्मा साळुंखे, सुनीता कोरबू, निजाम मुलाणी, मंगल नामद.
कृषी समिती
सुहास बाबर, मनीषा पाटील, विशाल चौगुले, सचिन हुलवान, धनाजी बिरमुळे, हर्षवर्धन देशमुख, जनाबाई पाटील, सुनीता पवार, मंदाकिनी कारंडे, संगीता नलवडे, किरण नवले.
महिला व बालकल्याण समिती
सुषमा नायकवडी, कलावती गौरगौडा, राजश्री एटम, संध्या पाटील, रेखा बाळगी, शोभा कांबळे, सीमा मांगलेकर, संगीता नलवडे, वंदना गायकवाड.पशुसंवर्धन समिती
सुहास बाबर, महादेव दुधाळ, मंगल नामद, माया कांबळे, विद्या डोंगरे, मंदाकिनी कारंडे, अरुण बालटे, आशा झिमूर, भगवान वाघमारे.