Sangli: ऊसतोड मजुर पुरविण्याच्या बहाण्याने साडेचार लाखांची फसवणूक

By संतोष भिसे | Published: December 28, 2023 03:27 PM2023-12-28T15:27:06+5:302023-12-28T15:27:23+5:30

सांगली : ऊसतोडीसाठी मजुर पुरविण्याच्या बहाण्याने एकाचा साडेचार लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी किरण श्रीपाल चव्हाण (वय ४७, ...

Four and a half lakhs fraud on the pretext of providing sugarcane workers | Sangli: ऊसतोड मजुर पुरविण्याच्या बहाण्याने साडेचार लाखांची फसवणूक

Sangli: ऊसतोड मजुर पुरविण्याच्या बहाण्याने साडेचार लाखांची फसवणूक

सांगली : ऊसतोडीसाठी मजुर पुरविण्याच्या बहाण्याने एकाचा साडेचार लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी किरण श्रीपाल चव्हाण (वय ४७, रा. समडोळी, ता. मिरज) यांनी सांगली ग्रामीण पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी संभाजी बिरु डोंबाळे (रा. घोलेश्वर, ता. जत) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

२०१६ ते २०१७ या वर्षभरात डोंबाळ याने फसवणूक केल्याची चव्हाण यांची तक्रार आहे. ऊसतोडीसाठी मजुर पुरविण्याच्या कामी चव्हाण यांनी डोंबाळे याला ९ लाख ३७ हजार ७३९ रुपये दिले होते. त्यापैकी ४ लाख ८७ ७३९ रुपयांचे काम संशयिताने केले. उर्वरित ४ लाख ५० हजार रुपयांच्या कामासाठी मात्र मजूर पुरविले नाहीत. चव्हाण यांनी गेली तीन-चार वर्षे पाठपुरावा केला, पण डोंबाळे याने दाद दिली नाही. त्यामुळे चव्हाण यांनी पोलिसांत धाव घेतली.

Web Title: Four and a half lakhs fraud on the pretext of providing sugarcane workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.