सांगलीत आयपीएलवर बेटींग घेणारी टोळी जेरबंद, चौघांना अटक; पावणे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

By शीतल पाटील | Published: May 2, 2023 07:00 PM2023-05-02T19:00:19+5:302023-05-02T19:00:45+5:30

बेटिंग लावणारे २३ जण रडारवर

Four arrested for betting on IPL in Sangli; Assets worth three lakhs seized | सांगलीत आयपीएलवर बेटींग घेणारी टोळी जेरबंद, चौघांना अटक; पावणे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

सांगलीत आयपीएलवर बेटींग घेणारी टोळी जेरबंद, चौघांना अटक; पावणे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext

सांगली : शहरातील कुपवाड परिसरात आयपीएलच्या सामन्यावर बेटींग घेणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. पोलिसांनी चार बुकींना जेरबंद केले असून मोबाईल, लॅपटाॅप, वाहनासह २ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विश्वनाथ संजय खांडेकर (वय २२, रा. गंगानगर रोड वारणाली), रतन सिद्धू बनसोडे (२७, रा. अलिशान काॅलनी, कुपवाड), गणेश मल्लाप्पा कोळी (२१, रा. झेडपी काॅलनी, वारणाली), संतोष सुरेश घाडगे (१९, रा. महावीरनगर, विश्रामबाग) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या टोळीकडून नऊ मोबाईल, चार दुचाकी, एक लॅपटाॅप असा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिस अधिक्षक डाॅ. बसवराज तेली यांनी आयपीएल सामन्यावर बेटिंग घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश एलसीबीच्या पथकाला दिले होते. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी कारवाईसाठी पथक नियुक्त केले होते. पथकातील दीपक गायकवाड व प्रशांत माळी यांना कुपवाड ते वाघमोडेनगर रस्त्यालगत एका शेतातील शेडमध्ये क्रिकेट सामन्यावर बेटींग घेतले जात असल्याची माहिती मिळाली. लखनऊ व बेंगलोर या संघातील सामन्यासाठी बेटींग सुरू असल्याचे सांगण्यात आले. पोलिस पथकाने तातडीने शेतातील शेडमध्ये छापा टाकला. 

यावेळी चौघेजण लॅपटाॅप, मोबाईलच्या सहाय्याने बेटींग घेत असल्याचे दिसून आले. विश्वनाथ खांडेकरसह चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. खांडेकर याची चौकशी केली असता क्रिकेट लाईव्ह गुरू नावाचे ॲपद्वारे बेटींग घेत असून धावासाठी एक रुपयाला एक रुपया तर हार जीवर वाढीव भावाने पैसे असल्याचे सांगितले. पोलिसांनी मोबाईल, लॅपटाॅप, वही, पेन व दुचाकी वाहने असा २ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या चौघांवर कुपवाड एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेटिंग लावणारे २३ जण रडारवर

बुकी विश्वनाथ खांडेकर याच्याकडून पोलिसांनी डायरी जप्त केली आहे. या डायरीत बेटींग खेळणारे व खेळविणाऱ्या २३ जणांची नावे व मोबाईल नंबर आहेत. त्या २३ जणांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

Web Title: Four arrested for betting on IPL in Sangli; Assets worth three lakhs seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.