चार मुले, तरीही आई-वडिलांची इच्छा मरणासाठी दया याचना; सांगली जिल्ह्यातील प्रकार
By संतोष भिसे | Published: December 21, 2023 05:01 PM2023-12-21T17:01:24+5:302023-12-21T17:01:35+5:30
आटपाडी : पोटाला चिमटे घेऊन चार मुलांचे संगोपन करत त्यांना मोठे केले ते संसारात रममाण झाल्याने आम्हाला सांभाळत नाहीत. ...
आटपाडी : पोटाला चिमटे घेऊन चार मुलांचे संगोपन करत त्यांना मोठे केले ते संसारात रममाण झाल्याने आम्हाला सांभाळत नाहीत. वृद्धापकाळाने निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्येला तोंड देणे अशक्य बनले आहे. जेष्ठ नागरिक कायद्यातर्गत न्याय द्यावा अन्यथा आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी आर्त विनवणी आटपाडी तालुक्यातील विठ्ठलापूर गावचे सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग दीक्षित व त्यांची पत्नी शालन यांनी केली आहे. याबाबात तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
विठ्ठलापूर येथील पांडुरंग विष्णू दीक्षित (वय ७९) हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. तर पत्नी शालन दीक्षित याचे वय ७७ आहे. त्यांना सुजित, संजय, सतीश, प्रवीण अशी चार मुले आहेत. मात्र ते आम्हाला सांभाळत नाहीत. मुलांनी आम्ही राहत असलेल्या घरातून हाकलले आहे. पत्नी शालन यांचे हात व पाय मोडले आहेत. त्यांना हाताने कोणतेही काम करता येत नाही. तर पांडुरंग यांना पाठीचा व हृदयाचा आजार आहे. वृद्धापकाळात विविध व्याधींनी त्रस्त असल्याने जगणे मुश्कील बनले आहे. इच्छामरणास परवानगी मिळावी आणि बेघर केल्याबद्दल जेष्ठ नागरिक कायद्याअंतर्गत न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.