corona in sangli : सांगलीतील कोरोनाग्रस्त कुटूंबातील चौघांचा अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 11:42 AM2020-04-20T11:42:00+5:302020-04-20T11:44:25+5:30
शहरातील विजयनगर परिसरातील एकाचा रविवारी सायंकाळी कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर याच कुटूंबातील चौघांचा अहवाल सोमवारी निगेटिव्ह आला. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील २७ पैकी २३ जणांचे अहवाल अजून येणार आहेत.
सांगली : शहरातील विजयनगर परिसरातील एकाचा रविवारी सायंकाळी कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर याच कुटूंबातील चौघांचा अहवाल सोमवारी निगेटिव्ह आला. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील २७ पैकी २३ जणांचे अहवाल अजून येणार आहेत.
शहरातील विजयनगर येथील सिध्दीविनायक हौंसिग सोसायटीमधील एका बँक कर्मचार्यास कोरोना झाल्याचे रविवारी तपासणीत स्पष्ट झाले होते. या रूग्णाचा उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती.
या रूग्णास कोरोना झाल्याचे निदान झाल्यानंतर तातडीने आरोग्य यंत्रणेने कुटूंबातील सर्वांना आयसोलेशन कक्षात ठेतले होते व त्यांचे स्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यातील कोरोनाबाधिताची पत्नी, आई-वडील व भाऊ यांचे अहवाल सोमवारी सकाळी निगेटिव्ह आले तर त्यांच्या मुलाचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.
याशिवाय कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेले बँकेतील त्यांचे सहकारी, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार करणारे डॉक्टर, कर्मचार्यांसह इतर सर्वांचे अहवाल अजून प्राप्त झाले नसल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.