कुपवाडला चार डिझेल चोरट्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:30 AM2021-03-09T04:30:02+5:302021-03-09T04:30:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुपवाड : शहरातील शाळेसमोर अंकुश महादेव भंडारे (रा. स्वामी मळा) यांच्या उभ्या असलेल्या ट्रकमधील डिझेल चोरल्याप्रकरणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : शहरातील शाळेसमोर अंकुश महादेव भंडारे (रा. स्वामी मळा) यांच्या उभ्या असलेल्या ट्रकमधील डिझेल चोरल्याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील ३ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्यात जितेंद्र निवृत्ती घोडके (वय ३१, रा. स्वामी मळा, कुपवाड), अनंत कृष्णा मेटकरी (२०), वैभव कृष्णा मेटकरी (१९, दोघेही रा. लक्ष्मीनगर, कुपवाड), निखिल महेश मागाडे (२१, रा. हडको काॅलनी, संजयनगर, सांगली) यांचा समावेश आहे.
अंकुश भंडारे यांनी रविवारी रात्री स्वामी मळा परिसरातील शाळेच्या आवारात ट्रक (एमएच ०४ सीपी ८६६७) उभा केला होता. मध्यरात्री संशयित चोरट्यांनी ट्रकमधील डिझेलची चोरी केली होती.
सोमवारी सकाळी ही चोरीची घटना उघडकीस आली. भंडारे यांनी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, सहाय्यक पोलीस फौजदार युवराज पाटील, जालिंदर पाटील, शिवानंद गव्हाणे, सतीश माने, इंद्रजित चेळकर, विजय गस्ते, सूरज मुजावर यांनी काही तासातच संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील डिझेल व चोरी करण्यासाठी वापरलेला टेम्पो (एमएच १० झेड ८८८४) असा ३ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.