चांदोली धरणाचे चारही दरवाजे खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 07:08 PM2017-08-29T19:08:30+5:302017-08-29T19:10:05+5:30

वारणावती (सांगली) : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढली असून मंगळवारी दुपारी धरणाचे चारही वक्राकार दरवाजे ०.५० मीटरने खुले केले आहेत. दरवाजातून ६००० क्युसेक व जलविद्युत प्रकल्पातून १६०० क्युसेक असा ७६०० क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरू झाला आहे. त्यामुळेनदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदी दुथडी भरून वाहत आहे. लोकांनी सतर्क राहावे, असा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.

Four doors of the Chandoli Dam open | चांदोली धरणाचे चारही दरवाजे खुले

चांदोली धरणाचे चारही दरवाजे खुले

googlenewsNext

वारणावती (सांगली) : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढली असून मंगळवारी दुपारी धरणाचे चारही वक्राकार दरवाजे ०.५० मीटरने खुले केले आहेत. दरवाजातून ६००० क्युसेक व जलविद्युत प्रकल्पातून १६०० क्युसेक असा ७६०० क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरू झाला आहे. त्यामुळेनदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदी दुथडी भरून वाहत आहे. लोकांनी सतर्क राहावे, असा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.


सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदोली धरण हे ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे मातीचे राज्यातील सर्वात मोठे धरण आहे. पावसाचे आगर समजल्या जाणाºया या परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने रिपरिप सुरू केली. पण सोमवारपासून पावसाने जोर वाढविला आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातून येणाºया पाण्याची आवक वाढली आहे.

गेल्या २४ तासात ४५ मिलिमीटर पावसासह एकूण १८४२ मिलिमीटर पावसाची नोंद येथील पर्जन्यमापकावर झाली आहे. मंगळवारी दिवसभर पावसाने जोर वाढवला होता. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे. पाण्याची आवक वाढल्याने धरण प्रशासनाने मंगळवारी सकाळी दहा वाजता धरणाचे दोन वक्राकार दरवाजे खुले केले. मात्र दुपारपर्यंत पाणी वाढल्याने दुपारी अडीच वाजता चारही वक्राकार दरवाजे खुले करण्याचा निर्णय घेतला.


धरण सोमवारी दुपारी चार वाजता पूर्ण क्षमतेने भरले. धरणाची पाणी पातळी नियंत्रणासाठी पाणी बाहेर सोडले जात आहे. पावसाचे प्रमाण वाढले, तर विसर्ग वाढविला जाणार आहे. त्यामुळे वारणा नदीच्या काठावरील लोकांनी सावधानता बाळगावी, असा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.

गतवर्षी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातील मुसळधार पावसामुळे धरणाचे दरवाजे ५ आॅगस्टला खुले केले होते. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक होते. प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २४ दिवस उशिराने धरणाच्या वक्राकार दरवाजातून पाणी बाहेर सोडले जात आहे.

२०१५ चा अपवाद वगळता दरवर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे वारणा धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शिराळा, वाळवा, शाहुवाडी, पन्हाळा, कºहाड या तालुक्यांतील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याबाबत कधीही तुटवडा जाणवलेला नाही.

Web Title: Four doors of the Chandoli Dam open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.