बुलडाणा जिल्ह्यात विविध अपघातात चार ठार
By admin | Published: July 21, 2016 11:47 PM2016-07-21T23:47:22+5:302016-07-21T23:47:22+5:30
दोन महिला व दुचाकीस्वाराचा समावेश; देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, खामगाव व शेगाव येथील घटना.
दत्ता पाटील --तासगावनगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. उमेदवारी निश्चित नसली तरी, इच्छुकांकडून प्रभागात चाचपणीला सुरुवात झाल्याचे चित्र आहे. प्रभागांची पुनर्रचना होऊन आरक्षणानंतर बहुतांश विद्यमान नगरसेवकांचे आरक्षण सोयीचे झाले आहे. त्यामुळे विद्यमान कारभाऱ्यांचा उमेदवारीसाठी अट्टाहास असल्याचे दिसून येत आहे. तसेच दुसरीकडे काही नवीन चेहऱ्यांनाही उमेदवारीचा हव्यास असून त्यासाठी आतापासूनच फिल्डिंग लावली जात आहे. त्यामुळे उमेदवारी निश्चित करताना नेत्यांची कसरत होणार आहे.
तासगाव नगरपालिकेत यावेळी नगरसेवकांची संख्या एकवीस झाली आहे. प्रभागांची पुनर्रचना होऊन आरक्षणातही फेरबदल झाले आहेत. निवडणुकीसाठी अजून अवधी आहे. मात्र आरक्षण जाहीर झाल्यापासून संबंधित इच्छुकांनी आतापासूनच प्रभागावर लक्ष केंद्रित केले आहे. जनतेच्या समस्यांपासून ते व्होट बँक असणाऱ्या समाजापर्यंत सर्वत्र चाचपणीस सुरुवात केली आहे. विद्यमान नगराध्यक्ष अविनाश पाटील, नगरसेवक बाबासाहेब पाटील, जाफर मुजावर, सुशिला साळुंखे, सारिका कांबळे, शिल्पा धोत्रे, विजया जामदार, शुभांगी साळुंखे यांना पुन्हा संधी मिळण्याची अपेक्षा आहे.
आरक्षणानंतर बहुतांश विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी मिळण्याची अपेक्षा आहे, तर नगरसेवक अमोल शिंंदे, शरद मानकर, अजय पवार, अनिल कुत्ते यांच्यापैकी काहींच्या प्रभागात आरक्षणाने पत्ता कट झाला आहे. काहींचे प्रभाग पुनर्रचनेमुळे विभागले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून सोयीच्या प्रभागाची चाचपणी सुरु आहे.
काही ठिकाणी एकाच गटाच्या (विशेषत: भाजपच्या) विद्यमान दोन नगरसेवकांकडून एकाच प्रभागावर डोळा ठेवून मोर्चेबांधणीस सुरुवात आहे. त्यामुळे उमेदवारीवरून रणधुमाळी होणार असल्याचे चित्र आहे. आरक्षणात बदल झाल्याने नगरसेवकांच्या नातेवाईकांनीही फिल्डिंग लावली आहे. त्यामध्ये विद्यमान नगरसेविका अनुराधा पाटील यांचे दीर सचिन पाटील, नगरसेविका सुशिला साळुंखे यांचा मुलगा अरुण साळुंखे यांची नावे चर्चेत आहेत.
यावेळचे निवडणुकीचे चित्र पाहिल्यानंतर, उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या विद्यमान नगरसेवकांचा भरणा मोठा आहे, तर काही जुने आणि नवे चेहरेही रिंगणात येण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी जोरदार मोर्र्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे उमेदवारी देताना सर्वच पक्षाच्या, विशेषत: भाजपमध्ये इच्छुकांचा मोठा भरणा असल्याने नेत्यांना उमेदवारी निश्चित करताना कसरत करावी लागणार आहे, हे नक्की.
..
विकास कामांचा नगरसेवकांना धसका
अपवाद वगळता अनेक विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागात विकास कामांबाबतीत नागरिकांची ओरड आहे. अनेक ठिकाणी कामे प्रलंबित आहेत. आता निवडणूक तोंडावर आल्याने नागरिकांकडून कामांच्याबाबतीत जाब विचारला जाणार, याची नगरसेवकांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रभागातील रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवकांनी पाठपुरावा सुरू केला आहे. त्याअनुषंगाने बुधवारी नगरपालिकेत नगरसेवकांची बैठकही झाल्याची चर्चा आहे.