कुपवाड एमआयडीसीत चार लाखांच्या कास्टींगची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:23 AM2021-01-17T04:23:20+5:302021-01-17T04:23:20+5:30
कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील वेस्टर्न प्रेसिकास्ट कंपनीतून चार लाख रुपये किमतीच्या कास्टींग मटेरिअलची चोरी झाली. याप्रकरणी कंपनीतील सुपरवायझर व ...
कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील वेस्टर्न प्रेसिकास्ट कंपनीतून चार लाख रुपये किमतीच्या कास्टींग मटेरिअलची चोरी झाली. याप्रकरणी कंपनीतील सुपरवायझर व टेम्पोचालक अशा दोघांच्या विरोधात कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र सुरेश साळुंखे (सध्या रा. कुपवाड, मूळ गाव कोडोली, सातारा) व निरंजन तुकाराम चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुपवाड एमआयडीसीलगत वेस्टर्न प्रेसिकास्ट या नावाने कंपनी कार्यरत आहे. कंपनीतील सुपरवायझर राजेंद्र साळुंखे याने शुक्रवारी (दि. १५) सकाळी टेम्पोचालक निरंजन चव्हाण याच्या टेम्पोतून (एम. एच. १०, एक्यू ६३२६) कंपनीतील चार लाख रुपये किमतीचे कास्टींग मटेरिअल चोरून नेले. या प्रकरणाची तक्रार कंपनीचे एच. आर. मॅनेजर महेश कुलकर्णी यांनी शनिवारी सकाळी कुपवाड पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी सांळुखे व चव्हाणविरोधात गुन्हा दाखल केला आहे.