जत ग्रामीण रुग्णालयात चार ऑक्सिजन बायपॅप मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:27 AM2021-05-27T04:27:43+5:302021-05-27T04:27:43+5:30
जत ग्रामीण रुग्णालयास चार ऑक्सिजन बायपॅप मशीनचे वाटप आ. विक्रम सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. लोकमत न्यूज नेटवर्क संख : ...
जत ग्रामीण रुग्णालयास चार ऑक्सिजन बायपॅप मशीनचे वाटप आ. विक्रम सावंत यांच्याहस्ते करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : कोरोना महामारीत सर्वसामान्यांना ऑक्सिजन, व्हेंटिलटर मिळत नाहीत. त्यांना त्रास होतो. ऑक्सिजन बायपॅप मशीनचा रुग्णांना फायदा होणार आहे, असे मत आ. विक्रम सावंत यांनी व्यक्त केले.
टाटा पॉवर कंपनीच्या पवनऊर्जा विभागातर्फे जत ग्रामीण रुग्णालय येथे चार ऑक्सिजन बायपॅप मशीन व कोरोना प्रतिबंधक कीटचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
आ. सावंत म्हणाले की, ग्रामीण भागातील लोकांना कोरोना कालावधीत धीर व मानसिक आधार दिला, तर होणारी हानी निश्चितच टाळता येईल.
प्रांताधिकारी प्रशांत आवटी म्हणाले, टाटा पॉवर कंपनी करीत असलेल्या सीएसआर प्रकल्पामुळे जत व आसपासच्या ग्रामीण भागात त्याचा फायदा झालेला आहे.
कंपनीचे अधिकारी विश्वास सोनवले म्हणाले, हा उपक्रम समाजकल्याण विभागामार्फत होत आहे. सयंत्र लोकांचे प्राण वाचवण्यासाठी मदत करेल.
साहेबराव पुजारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बंडगर, ग्रामसेवक कामेश्वर ऐवळे, प्रा. तुकाराम सन्नके उपस्थित होते.