मिरज शासकीय रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे चार रुग्ण दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:26 AM2021-05-16T04:26:22+5:302021-05-16T04:26:22+5:30
कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण होत असल्याने ...
कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण होत असल्याने जिल्ह्यात रुग्ण सापडत आहेत. मिरज शासकीय रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या चार रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून, यापैकी दोघांची स्थिती अत्यवस्थ आहे. रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्यांना या आजाराचा सर्वाधिक धोका असल्याने लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन डाॅक्टरांनी केले आहे. कोरोनातून बरे होण्यासाठी स्टेरॉइड्सचा वापर सुरू आहे. अनियंत्रित मधुमेह असलेल्या रुग्णांनाही बुरशीजन्य आजार म्युकरमायकोसिसची लागण होत आहे. या आजारामुळे रुग्णांना दृष्टी कमी होणे, अशी लक्षणे दिसतात. मेंदूत बुरशी जमा झाल्याने हा आजार इतर बुरशीच्या आजारापेक्षा अधिक घातक असल्याचे वैद्यक तज्ज्ञांचे मत आहे. जिल्ह्यातही या आजाराचे रुग्ण सापडत असल्याने मधुमेह असलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. रुग्णांमध्ये कोविड आजार बरा झाल्यानंतर बारा ते चौदा दिवसांनंतर या आजाराची लक्षणे दिसत आहेत. मिरजेत उपचार घेणाऱ्या चार रुग्णांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. म्युकरमायकोसिसने जिल्ह्यात प्रवेश केल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.