चौदा माजी संचालक निवडणुकीसाठी पात्र
By admin | Published: July 8, 2015 11:45 PM2015-07-08T23:45:41+5:302015-07-08T23:45:41+5:30
बाजार समिती निवडणूक : ३० उमेदवारी अर्ज अवैध; घोरपडे गटाच्या आक्षेपामुळे वातावरण तापले
मिरज : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौदा माजी संचालकांविरोधातील छाननीवेळी घेण्यात आलेले आक्षेप बुधवारी रात्री उशिरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला. आता या निवडणुकीसाठी माजी मंत्री मदन पाटील यांच्यासह माजी संचालक पात्र ठरले आहेत.
बाजार समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांच्या उपस्थितीत झाली. मदन पाटील यांच्यासह १४ माजी संचालकांच्या उमेदवारी अर्जास घोरपडे गटाच्या उमेदवारांनी आक्षेप घेतला. भ्रष्टाचाराच्या कारणावरून बाजार समिती बरखास्त झाली असल्याने तत्कालीन संचालकांना निवडणुकीस अपात्र ठरविण्याची मागणी तात्यासाहेब नलवडे, श्रीरंग डुबुले, संभाजी पवार यांनी केली. माजी संचालकांविरुध्द तक्रारदारांचे वकील अॅड. ए. ए. पितांबरे, बाजार समितीचे वकील अॅड. अरविंद देशमुख यांनी भ्रष्टाचाराच्या कारणावरुन माजी संचालक निवडणुकीस अपात्र ठरत असल्याचा आक्षेप घेतला. माजी संचालकांतर्फे अॅड. ए. बी. पाटील यांनी, सहकार कायद्याप्रमाणे बाजार समिती बरखास्त करण्यात आली असली तरी, वैयक्तिक संचालकांना बरखास्त करण्यात आले नसल्याचा युक्तिवाद केला. निकम यांनी आक्षेपावर निर्णय राखून ठेवला.
रात्री नऊ वाजता या सर्व संचालकांना पात्र ठरविण्यात आले. कोल्हापुरात अशा प्रकरणात माजी संचालकांच्या बाजूने निकाल झाला आहे, तर औरंगाबाद खंडपीठाने बरखास्त संस्थेच्या माजी संचालकांना निवडणूक लढविण्यास परवानगी दिली होती. या आधारे निकम यांनी आक्षेप फेटाळून लावला.
अर्ज वैध ठरलेले प्रमुख उमेदवार -
प्रक्रिया गट - विशाल पाटील, पांडुरंग माने, प्रकाश पाटील, संभाजी मेंढे, इंद्रजित पाटील.
हमाल गट - गजानन शिंदे, तानाजी शिंदे, जयवंत सावंत, नागाप्पा म्हेत्रे, विलास काळे, विठ्ठल यमगर, लक्ष्मण ऐवळे, श्रीमंत बंडगर.
व्यापारी गट - प्रशांत सावर्डेकर, शिवाजी सगरे, रमेश कुंभार, शैलेश पवार, विलास मोहिते, नितीन पाटील, सचिन घेवारे, शीतल पाटील, शरद पाटील, राजेश होसमनी, रमेश कुंभार, अनिल पाटील.
ग्रामपंचायत - विजय गुरव, संजय गडदे, सुनील माळी, अभिजित चव्हाण, अनिल शेगुणशी, प्रदीप करगणे, स्वप्नील नलवडे, अरुण पाटील, अभिजित चव्हाण, शीतल पाटील, अनिल शेगुणशी, मारूती पवार, नितीन पाटील, स्वप्नील पाटील, प्रवीण खोत, वसंतराव गायकवाड, नितीन दणाणे, पुष्पराज शिंदे.
इतर मागासवर्गीय गट - तमणगौडा रवी, पिरासाहेब शेख, गुरुबाळय्या हिरेमठ, साहेबराव टोणे, वहाब मुल्ला, विष्णू मिरजे, सतीश निळकंठ.
सहकारी संस्था गट - दादासाहेब कोळेकर, सरदार पाटील, माणिक वाघमोडे, महादेव दुधाळ, आकाराम मासाळ, राजाराम पाटील, बाळकृष्ण बुर्ले, कुमार पाटील, अण्णासाहेब खोत, विलास कोळेकर, अण्णा सायमोते, राजाराम जानकर, सुरेश कोळेकर, सुरेश कट्टे, वंदना बावधनकर, सुनीता पांढरे, अलका पाटील, दादासाहेब कोळेकर, अभिजित चव्हाण, एम. के. पाटील, अण्णासाहेब नामद, रवी तमणगौडा, मारूती पवार, आकाराम मासाळ, साहेबराव टोणे, जीवन पाटील, वसंत पाटील, शरद पाटील, प्रशांत शेजाळ, विलास कोळेकर, तात्या नलवडे, इंद्रजित पाटील, सुजय शिंदे, भगवान हरूगडे. (वार्ताहर)
या संचालकांना मिळाला दिलासा
माजी संचालक मदन पाटील, प्रकाश जमदाडे, महादेव अंकलगी, संभाजी पाटील, भारत कुंडले, भारत डुबुले, भानुदास पाटील, विठ्ठल कोळेकर, रमेश बिरादार, राजेंद्र कुंभार, मुजीर जांभळीकर, बाळासाहेब बंडगर, दीपक लोंढे, मैनुद्दीन बागवान यांना दिलासा मिळाला.
या निकालावर अजितराव घोरपडे यांनी टीका केली असून भ्रष्ट संचालक निवडून जाणार असतील तर बाजार समितीची जिल्हा बँक होण्यास वेळ लागणार नाही, असा टोला लगाविला.