Sangli: बनावट सोने तारण ठेवून फसवणूक, कोकरुड येथील बँक ऑफ इंडियाला ५७ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 11:54 AM2024-01-19T11:54:18+5:302024-01-19T11:54:55+5:30

कोकरुड : कोकरुड (ता. शिराळा) येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये बनावट सोने तारण ठेवून बँकेची ५७ लाख ६१ हजार ...

Fraud by pledging fake gold, 57 lakhs to Bank of India at Kokarud sangli | Sangli: बनावट सोने तारण ठेवून फसवणूक, कोकरुड येथील बँक ऑफ इंडियाला ५७ लाखांचा गंडा

Sangli: बनावट सोने तारण ठेवून फसवणूक, कोकरुड येथील बँक ऑफ इंडियाला ५७ लाखांचा गंडा

कोकरुड : कोकरुड (ता. शिराळा) येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये बनावट सोने तारण ठेवून बँकेची ५७ लाख ६१ हजार ४९८ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एकूण २६ जणांवर विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहेत. संशयितांमध्ये शिराळा, वाळवा, शाहूवाडी तालुक्यांतील लोकांचा समावेश आहे.

कोकरुड शाखेचे शाखाधिकारी योगेश विलास देसाई (रा. वाळवा) यांनी कोकरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित विक्रम रघुनाथ जगताप (इस्लामपूर), संजय अनंत पोतदार (कोकरुड), अक्षय रामचंद्र जाधव (चरण), अलका पोपट शिंदे (मांगरुळ), अमोल तानाजी मगदूम (बिळाशी), बाबूराव बाळू सावंत (खुजगाव), ज्ञानदेव मधुकर पाटील (बिळाशी), जयश्री शशिकांत सुतार (मालेवाडी), महादेव बाबूराव यमगर (बिळाशी), मीनाक्षी जनार्दन सुतार (खुजगाव), पायल विकास शेणवी (मांगरुळ), प्रदीप आनंदा सावंत (खुजगाव),

राजश्री प्रकाश शेणवी (मांगरुळ), राजेश वसंत घोरपडे (बहादूरवाडी), रवींद्र दादासो पाटील (थेरगाव), रेखा नामदेव लोहार (भराडवाडी), संभाजी गुंडा सावंत (खुजगाव), संपत लक्ष्मण बेबले (बिळाशी), संगीता बाबूराव सावंत (खुजगाव), सानिका सुनील लोहार (रेठरे), सारिका संतोष कासार (कोकरुड), सविता मारुती झाडे (मालेवाडी), शिवाजी वसंत कदम (रेठरे), सोनाली हंभीरराव घोडे (कोकरुड), सुरेखा रामचंद्र मोहिते (कोकरुड), विकास लक्ष्मण शेणवी (मांगरुळ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

२६ डिसेंबर २०२२ ते ४ डिसेंबर २०२३ या कालावधीत वेगवेगळ्या तारखेस कोकरुड येथील बँक ऑफ इंडियाच्या कोकरुड शाखेमध्ये १७३१ ग्रॅम वजनाचे बनावट व नकली सोन्याचे दागिने खरे व शुद्ध असल्याचे भासवून बँकेकडे ठेवले. त्यावर कर्जाऊ रक्कम घेऊन ५६ लाख ६१ हजार ४९८ रुपये घेतले. त्यावर होणारे व्याज अशी आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबतचा गुन्हा कोकरुड पोलिसात दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक संतोष गोसावी तपास करत आहेत.

Web Title: Fraud by pledging fake gold, 57 lakhs to Bank of India at Kokarud sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.