फसवणूकप्रकरणी मुकादमावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:23 AM2021-01-04T04:23:22+5:302021-01-04T04:23:22+5:30
ऊसतोड मजूर पुरवतो असे सांगून तालुक्यातील खंबाळे औंध येथील अप्पासाहेब यशवंत भोसले (वय ४१) यांची १ लाख ८० हजार ...
ऊसतोड मजूर पुरवतो असे सांगून तालुक्यातील खंबाळे औंध येथील अप्पासाहेब यशवंत भोसले (वय ४१) यांची १ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित मुकादम राजू काशीनाथ चव्हाण (वय ३९ रा. गिरझणी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्याविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अप्पासाहेब भोसले यांच्याकडून ऊस मजूर पुरवतो, असे सांगून संशयित राजू काशीनाथ चव्हाण याने खंबाळे औंध (ता. कडेगाव) येथे ८० हजार रोख रक्कम घेतली. तसेच अकलूज, जि. सोलापूर येथील तहसील कार्यालय येथे नोटरी करून रोख १ लाख रुपये घेऊन मजूर पुरवले नाहीत. याबाबत कडेगाव पोलीस ठाण्यात अप्पासाहेब भोसले यांनी राजू चव्हाण याच्या विरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.