इस्लामपुरात तिघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:20 AM2020-12-07T04:20:26+5:302020-12-07T04:20:26+5:30
इस्लामपूर : शहर हद्दीतील एका खासगी मालकाच्या जागेतून बनावट कागदपत्रे तयार करून सार्वजनिक रस्ता दाखवून फसवणूक केल्याबद्दल न्यायालयाच्या आदेशाने ...
इस्लामपूर : शहर हद्दीतील एका खासगी मालकाच्या जागेतून बनावट कागदपत्रे तयार करून सार्वजनिक रस्ता दाखवून फसवणूक केल्याबद्दल न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. याबाबत सुनील सुभाष पवार (इस्लामपूर) यांनी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती.त्यानुसार रोहन सुनील शिंगण (गांधी चौक, इस्लामपूर), तसेच अशोक दगडू चव्हाण आणि अमितकुमार नथू बांडे या भूमिअभिलेख कार्यालयातील दोघांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील पवार यांची शहर हद्दीत जागा आहे. त्यांच्या जागेतून त्यांच्या मालकीचा सार्वजनिक रस्ता होता. त्याबद्दल शिंगण याने खोटे आणि बनावट कागदपत्रे तयार करून भूमिअभिलेख कार्यालयातून हा रस्ता सार्वजनिक करून घेतल्याचा आक्षेप पवार यांनी घेतला आहे. पोलीस उपनिरीक्षक डी. पी. शेडगे अधिक तपास करत आहेत.