केंद्र, राज्य शासनाकडून जनतेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 11:24 PM2017-07-23T23:24:11+5:302017-07-23T23:24:11+5:30

केंद्र, राज्य शासनाकडून जनतेची फसवणूक

Fraud fraud by the Center, State Government | केंद्र, राज्य शासनाकडून जनतेची फसवणूक

केंद्र, राज्य शासनाकडून जनतेची फसवणूक

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
आटपाडी : राज्य व केंद्र शासन रोज नवनव्या घोषणा करून जनतेची फसवणूक करीत आहे. जे भाजपात गेले, ते घाबरून गेलेले आहेत. पक्षावर निष्ठा असणारा, खा. शरद पवारांवर प्रेम करणारा सामान्य कार्यकर्ता पक्षासमवेत आहे. दीड-दोन महिन्यात माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना बोलावून पक्षाचे शिबिर घेऊ, असा विश्वास माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी आटपाडी येथील सभेत बोलताना व्यक्त केला.
टेंभू योजनेच्या निधीबद्दल विधानसभेत आवाज उठविण्याबरोबरच कृष्णा व कोयना नद्यांतून वाहून जाणारे पुराचे पाणी तातडीने उचलून आटपाडीसह दुष्काळी तालुक्यांना द्यावे, अशी मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येथील कल्लेश्वर मंदिर हॉलमध्ये आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने युवक, महिला, विद्यार्थी यांसह विविध सेलचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना आ. पाटील यांच्याहस्ते निवडीची पत्रे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, खानापूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब मुळीक, महिला जिल्हाध्यक्षा सौ. छाया पाटील, युवक जिल्हाध्यक्ष भरत देशमुख, विद्यार्थी जिल्हाध्यक्षा स्वप्नील जाधव आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, राज्य व केंद्र शासन रोज नवनव्या घोषणा करून जनतेची फसवणूक करीत आहे. हे शासन बेजबाबदार आहे. काही तरी होईल, अशी आशा बाळगणाऱ्या राज्यातील जनतेचा पूर्ण भ्रमनिरास झाला आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचे आरक्षण देणाऱ्या सरकारला अजून मुहूर्त मिळालेला नाही. मराठा व मुस्लिम समाजाचे आरक्षणही प्रलंबित आहे. नोटाबंदीने आपल्या परिसरातील डाळिंबासह शेतीमालाचे दर कोसळले असून, जीएसटीमुळे बाजारपेठ ठप्प झाली आहे.
यावेळी सौ. छाया पाटील, बाबासाहेब मुळीक, भरत देशमुख, स्वप्नील जाधव, नूतन महिला तालुकाध्यक्षा सौ. अश्विनी गायकवाड, युवक तालुकाध्यक्ष निखिल दिवटे, विद्यार्थी सेलचे तालुकाध्यक्ष सागर काळे, अ‍ॅड. अजित वसेकर सादिक खाटिक यांचीही भाषणे झाली.
तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी दुष्काळी भागाचे प्रश्न विधानसभेत मांडून आम्हास न्याय द्या, ताकद द्या, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी माजी सभापती जयमाला देशमुख, पं. स. सदस्या सौ. उषाताई कुठे, किसन जानकर, कल्लाप्पा कुठे, भाऊसाहेब देशमुख, रणजित देशमुख, रोहित देशमुख, शरद नांदुगडे, जालिंदर कात्रे, रमेश मोरे, अनिल ऐवळे, माणिक पांढरे, संपतराव पाटील, अविनाश बनसोडे, साहेब कदम, ईश्वरा ऐवळे, रियाज शेख, राघो रणदिवे, नितीन माळी उपस्थित होते.
त्यांना विसरणार नाही
विलासराव शिंदे म्हणाले, ज्यांना आम्ही मागेल ते-ते दिले, तीच मंडळी ऐन जिल्हा परिषद व तालुका पंचायत समिती निवडणुकीत आमचा पक्ष सोडून गेली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आटपाडी तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्षाची लाज राखण्याचे काम केले आहे. आम्ही आपणास कधीही विसरणार नाही.

Web Title: Fraud fraud by the Center, State Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.