सांगली: दामदुप्पटचे आमिष, आळसंदच्या एकाला ८ लाखांचा गंडा; साताऱ्यातील दोघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 04:08 PM2022-07-08T16:08:13+5:302022-07-08T16:08:44+5:30

आमच्याकडे लोकांनी सुमारे ४ कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. तुम्हीही गुंतवणूक करा, तुम्हाला ११ महिन्यात सर्व रक्कम दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवले.

Fraud of one from Alsund in Sangli district by showing lure under the name in the stock market | सांगली: दामदुप्पटचे आमिष, आळसंदच्या एकाला ८ लाखांचा गंडा; साताऱ्यातील दोघांवर गुन्हा दाखल

सांगली: दामदुप्पटचे आमिष, आळसंदच्या एकाला ८ लाखांचा गंडा; साताऱ्यातील दोघांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

विटा : शेअर मार्केटमध्ये ११ महिन्यात दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून आळसंद (ता.खानापूर) येथील शिवराज बाळासाहेब भोसले (वय ४१) यांना ८ लाख ७ हजार ५०० रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संशयित ठकसेन सूरज पांडूरंग जाधव व पांडूरंग एकनाथ जाधव (दोघेही रा. गुरसाळे, ता.खटाव, जि. सातारा) या पिता-पुत्रावर विटा पोलिसांत गुरूवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

आळसंद येथील शिवराज भोसले यांच्या मित्राची गुरसाळे येथील सूरज व पांडूरंग जाधव या पिता-पुत्राची ओळख होती. त्या मित्रानेच भोसले यांची ओळख संशयित पिता-पुत्राशी करून दिली. त्यातूनच भोसले व संशयित सूरज या दोघांचा फोनवरून संपर्क होऊ लागला. त्यावेळी सूरजने मी शेअर मार्केटचे काम करीत असून माझे मुंबईतील खारघर येथे कार्यालय आहे. आमच्याकडे लोकांनी सुमारे ४ कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. तुम्हीही गुंतवणूक करा, तुम्हाला ११ महिन्यात सर्व रक्कम दामदुप्पट देण्याचे आमिष संशयित सूरज व त्याचे वडील पांडूरंग जाधव या दोघांनी भोसले यांना दाखविले.

या आमिषाला बळी पडून भोसले यांनी दि. १० जानेवारी २०२१ ते दि. ६ एप्रिल २०२१ या कालावधीत जाधव पिता-पुत्राला स्टेट बॅँकेच्या विटा शाखेतून धनादेशाव्दारे ५ लाख रूपये व त्यानंतर वेळोवेळी रोख स्वरूपात ३ लाख ७ हजार ५०० असे एकूण ८ लाख ७ हजार ५०० रूपये दिले. या रक्कमेची ११ महिन्याची मुदत संपल्यानंतर भोसले यांनी पिता-पुत्राकडे त्यांनी गुंतवणूक केलेली दामदुप्पट रक्कम मागितली. त्यावेळी या पिता-पुत्राने वेगवेगळी कारणे सांगून त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिवराज भोसले यांनी गुरूवारी रात्री विटा पोलीसांत सूरज पांडूरंग जाधव व त्याचे वडील पांडूरंग एकनाथ जाधव या पिता-पुत्राविरूध्द ८ लाख ७ हजार ५०० रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Fraud of one from Alsund in Sangli district by showing lure under the name in the stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.