इस्लामपुरातील भंगार विक्रेत्याची पावणेतीन लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:41 AM2020-12-16T04:41:14+5:302020-12-16T04:41:14+5:30
इस्लामपूर : शहराच्या कोल्हापूर रस्त्यावरील एका भंगार विक्रेत्याची बीड जिल्ह्यातील दगडी गावातील ट्रकचालकाने २ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक ...
इस्लामपूर : शहराच्या कोल्हापूर रस्त्यावरील एका भंगार विक्रेत्याची बीड जिल्ह्यातील दगडी गावातील ट्रकचालकाने २ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली. इस्लामपूरहून जालना येथे पोहोच करण्यासाठी या चालकाच्या ताब्यात दिलेल्या भंगाराची त्याने परस्पर विल्हेवाट लावली. हा प्रकार २३ नोव्हेंबर रोजी घडला आहे.
याबाबत येथील भंगार व्यावसायिक शिराज अहमद मुहंमद रईस खान याने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामेश्वर मदन घोरड (रा. दगडी शहाजानपूर, जि. बीड) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. खान यांच्याकडील ९ टन वजनाचे भंगार जालना येथे पाठवायचे होते. त्यासाठी त्यांनी कऱ्हाड येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अल्ताफ आजमुद्दीन सवार यांच्याकडून मालट्रक भाड्याने ठरविला होता. ट्रकचालक रामेश्वर घोरड याने (क्र एमएच ०४ एच ६५४९) या बनावट नंबर प्लेटचा वापर करत त्या मालट्रकमधून खान यांचा भंगार माल घेऊन त्याची परस्पर विल्हेवाट लावत फसवणूक केली.