महापालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणुकीचा धंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:32 AM2021-09-10T04:32:38+5:302021-09-10T04:32:38+5:30

सांगली : महापालिकेत नोकर भरती केली जाणार असल्याचे सांगून तरुणांची फसवणूक करण्याचा उद्योग सध्या जोरात सुरू आहे. नोकर भरतीच्या ...

Fraud under the guise of a job in the corporation | महापालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणुकीचा धंदा

महापालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणुकीचा धंदा

googlenewsNext

सांगली : महापालिकेत नोकर भरती केली जाणार असल्याचे सांगून तरुणांची फसवणूक करण्याचा उद्योग सध्या जोरात सुरू आहे. नोकर भरतीच्या टोळ्याही सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्यांकडून तरुणांशी संपर्क साधून टोकन रक्कमही घेतली जात आहे. त्यात अनेक तरुण महापालिका अधिकाऱ्यांकडेही नोकरीसाठी अर्ज करू लागले आहेत. त्यामुळे अधिकारीही चक्रावले आहेत.

महापालिकेने नुकतेच सेवा नियम व आकृतीबंध प्रसिद्ध केला आहे. त्यावर हरकती व सूचना मागविल्या आहेत. हा आकृतीबंध शासनाकडून मंजूर झाल्यानंतर नवीन पदाची निर्मिती होणार आहे. सध्या महापालिकेत कुठल्याप्रकारची नोकरी भरती सुरू नाही. तरीही आकृतीबंधाचा आधार घेत काहीजणांनी महापालिकेत नोकर भरती सुरू असल्याचे सांगून बेरोजगार तरुणांना जाळ्यात अडकविण्यास सुरुवात केली आहे. राजकीय व सामाजिक संघटनांशी संबंधित काहीजणांनी आतापर्यंत भरती सुपारी घेण्यास सुरुवात केली आहे. काहीजणांनी टोकन रक्कम घेतल्याचे समजते.

शहरात नोकर भरतीची मोठी हवा निर्माण झाली आहे. काही तरुणांनी थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधत नोकरीसाठी अर्जही केला आहे. महापालिकेत कुठलीही नोकर भरती नसताना मोठ्या प्रमाणात चौकशीसाठी तरुण येऊ लागल्याने अधिकारीही चक्रावून गेले आहेत. या तरुणांची समजूत काढून त्यांना माघारी पाठविले जात आहे.

चौकट

आमिषाला बळू पडू नका : राहुल रोकडे

महापालिकेत सध्या नोकर भरती सुरू नाही. शासनाकडूनच नोकर भरतीवर निर्बंध आहेत. सध्या नव्याने आकृतीबंध व सेवा नियम तयार केले आहेत. त्याचा नोकर भरतीशी काहीही संबंध नाही. काही तरुण महापालिकेत नोकरीसाठी अर्जही करीत आहेत. तरुणांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये. तसेच कोणाशीही आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले आहे.

Web Title: Fraud under the guise of a job in the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.