आळसंदमध्ये कोरोना रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:27 AM2021-05-11T04:27:39+5:302021-05-11T04:27:39+5:30
फोटो ओळ : आळसंद (ता. खानापूर) येथे अजित जाधव यांनी कोरोना रुग्णांसाठी सुरू केलेल्या मोफत रुग्णवाहिकेचे आ. अनिल बाबर ...
फोटो ओळ : आळसंद (ता. खानापूर) येथे अजित जाधव यांनी कोरोना रुग्णांसाठी सुरू केलेल्या मोफत रुग्णवाहिकेचे आ. अनिल बाबर यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी हिम्मतराव जाधव, किरण कचरे, अजित जाधव, डॉ. संग्राम जाधव उपस्थित होते.
आळसंद : ग्रामसमिती व लोकांनी स्वतःची जबाबदारी ओळखून गावात रुग्णसंख्या वाढू नये यासाठी प्रयत्न केल्यास कोविडचा आकडा कमी करू शकतो. अजित जाधव यांनी मोफत रुग्णवाहिका सुरू करून सामाजिक बांधीलकी जपली आहे, असे मत आमदार अनिल बाबर यांनी व्यक्त केले.
आळसंद (ता. खानापूर) येथील ग्रामपंचायत सदस्य अजित जाधव यांनी कोरोना रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सुरू केली आहे. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आ. अनिल बाबर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच हिम्मतराव जाधव, किरण कचरे, डॉ. संग्राम जाधव, अजित जाधव उपस्थित होते.
अजित जाधव म्हणाले, कोरोना काळात माणूस माणुसकी हरवून बसला असल्याचे विदारक चित्र आहे. हे बघून आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो. याच भावनेतून मोफत रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी अमर जाधव, अरुण जाधव, विठ्ठल कचरे, संतोष माने, स्वरूप कचरे, अमित पाटील, कैलास जाधव, राहुल जाधव उपस्थित होते.