मोदींच्या शपथविधीनिमित्त मिरजेमध्ये दिवसभर मोफत केशकर्तन, रिक्षासेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:09 IST2019-05-31T00:08:45+5:302019-05-31T00:09:09+5:30
मिरज : नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या आनंदाप्रीत्यर्थ मिरजेच्या ब्राह्मणपुरीतील शिवनेरी चौकातील हेअर कटिंग सलूनचे मालक उमेश कदम व महेश ...

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या आनंदाप्रीत्यर्थ मिरजेत रिक्षाचालक संजय गोडबोले यांनी दिवसभर वृद्ध, अंध व दिव्यांग व्यक्ती आणि रुग्णांना मोफत रिक्षासेवा दिली. दुसºया छायाचित्रात दिवसभर मोफत दाढी व कटिंग करण्याचा उपक्रम करणाºया उमेश कदम व महेश गंगधर यांचा भाजप नेते मकरंद देशपांडे यांनी सत्कार केला.
मिरज : नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या आनंदाप्रीत्यर्थ मिरजेच्या ब्राह्मणपुरीतील शिवनेरी चौकातील हेअर कटिंग सलूनचे मालक उमेश कदम व महेश गंगधर यांनी गुरुवारी दिवसभर मोफत दाढी व कटिंग करण्याचा उपक्रम राबविला. गरीब नागरिकांसह भाजपप्रेमी कार्यकर्त्यांनी त्यांच्या या उपक्रमाचा लाभ घेतला.
भाजप नेते मकरंद देशपांडे नगरसेवक पांडुरंग कोरे, निरंजन आवटी, सागर आवटी, दिगंबर जाधव, बाबासाहेब आळतेकर, गणेश माळी, योगेश कुलकर्णी, श्रीकांत महाजन, सुभाष कपूर, सतीश शिंदे यांनी उमेश कदम व गंगधर यांचा सत्कार केला.
तसेच एक चहावाला देशाचा दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल श्रीकांत चौकात भाजपतर्फे नागरिकांना ३५३ कप चहाचे वाटप करून मोदी यांना शुभेच्छा देण्यात आल्या. ओंकार शुक्ल, मोहन व्हनखंडे, जयगोंड कोरे, सचिन चौगुले, तानाजी घार्गे, संजय चौगुले, गणेश चौगुले, सुधीर नाईक, अभिरूप कांबळे, मोहन वाटवे, पप्पू शिंदे, सुफी भोकरे, शीतल पाटोळे, भास्कर कुलकर्णी, संतोष कुलकर्णी उपस्थित होते.
शिवनेरी चौकातील रिक्षाचालक संजय गोडबोले यांनी मोदींच्या शपथविधीबद्दल दिवसभर वृद्ध, अंध व दिव्यांग व्यक्ती आणि रुग्णांना मोफत रिक्षासेवा दिली. सायंकाळी जिलेबी चौकात उदय शहा मित्रमंडळातर्फे फटाक्यांची आतषबाजी व जिलेबी वाटप करण्यात आले.