मुक्त संचार गोठ्याचे सांगली मॉडेल राज्यात आदर्शवत - सुहास बाबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:24 AM2019-02-26T00:24:07+5:302019-02-26T00:25:02+5:30
मुक्त संचार गोठ्यामुळे पशुधनाचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होणार असल्यामुळेच जिल्हा परिषदेने जिल्ह्यात मुक्त संचार गोठ्याची संकल्पना राबविली आहे. या मुक्त संचार गोठ्याचे सांगली मॉडेल राज्यात आदर्शवत ठरेल, असे
सांगली : मुक्त संचार गोठ्यामुळे पशुधनाचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होणार असल्यामुळेच जिल्हा परिषदेने जिल्ह्यात मुक्त संचार गोठ्याची संकल्पना राबविली आहे. या मुक्त संचार गोठ्याचे सांगली मॉडेल राज्यात आदर्शवत ठरेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले.
जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील वीस शेतकऱ्यांचा ‘लोकनेते राजारामबापू पाटील आदर्श गोपालक’ पुरस्काराने गौरव केला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाबर बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, मुख्य वित्त अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय धकाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, सरदार पाटील, भगवान वाघमारे, नीलम सकटे, मंदाकिनी करांडे, राजश्री एटम, आशा झिमूर आदी यावेळी उपस्थित होते.
बाबर म्हणाले, मुक्त संचार गोठा ही दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी यशाची गुरुकिल्ली आहे. गाई कायम स्वच्छ राहतात व दगडी (मस्टाईटीस) सारख्या आजारांचे प्रमाण कमी होते. गार्इंवरील तणाव कमी होऊन रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहण्यास मदत होते. दूध उत्पादन वाढते. सांगली जिल्ह्यातील मुक्त संचार गोठ्याचा यशस्वी प्रयोग राज्यभरात जाण्यास मदत होणार आहे.जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. विजय सावंत यांनी प्रास्ताविक केले. डॉ. चंद्रकांत सुतार यांनी आभार मानले.
पुरस्काराचे मानकरी...
दत्तात्रय पाटील (माधवनगर, ता. मिरज), जयंती चव्हाण (समडोळी, ता. मिरज), राजाराम दबडे (सराटी, ता. कवठेमहांकाळ), उमेश चव्हाण (रांजणी, ता. कवठेमहांकाळ), शशिकांत नाईक (शेगाव, ता. जत) ज्ञानेश्वर माळी (बाज, ता. जत), सुब्राव दबडे (करगणी, ता. आटपाडी), सुरेश सावंत (पळसखेळ, ता. आटपाडी), उत्तम साळुंके (बलवडी-भाळवणी, ता. खानापूर ), धनश्री जाधव (जाधवनगर, ता. खानापूर), जयश्री गिरी (बस्तवडे, ता. तासगाव), बबन पवार (मणेराजुरी, ता. तासगाव), प्रकाश शेटे (ऐतवडे बुद्रुक, ता. वाळवा), पवन फार्णे (शिगाव, ता. वाळवा), प्रशांत पाटील (कापरी, ता. शिराळा), बाजीराव पाटील (बिळाशी, ता. शिराळा), जयश्री पाटील (बुर्ली, ता. पलूस), सुनील पाटील (भिलवडी, ता. पलूस ), भगवान मुळीक (आसद, ता. कडेगाव), विष्णू पवार (शिवनी, ता. कडेगाव) या शेतकºयांचा ‘लोकनेते राजारामबापू पाटील आदर्श गोपालक’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.