रुग्णवाहिका, ऑक्सिजन वाहनांसाठी रिलायन्सच्यावतीने मोफत डिझेल सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:25 AM2021-05-17T04:25:55+5:302021-05-17T04:25:55+5:30

कोरोना रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका व ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी रिलायन्स मोबिलिटीच्यावतीने दररोज ५० लीटर डिझेल मोफत देण्यात ...

Free diesel facility on behalf of Reliance for ambulances, oxygen vehicles | रुग्णवाहिका, ऑक्सिजन वाहनांसाठी रिलायन्सच्यावतीने मोफत डिझेल सुविधा

रुग्णवाहिका, ऑक्सिजन वाहनांसाठी रिलायन्सच्यावतीने मोफत डिझेल सुविधा

googlenewsNext

कोरोना रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका व ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी रिलायन्स मोबिलिटीच्यावतीने दररोज ५० लीटर डिझेल मोफत देण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र संचालक नीलेश जाधव यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना दिले. यावेळी संग्राम पाटील, नितीन जाधव उपस्थित होते .

लोकमत न्यूज नेटवर्क

कामेरी : कोरोनाबाधित रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका व ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी रिलायन्स बी.पी. मोबिलिटी कंपनीच्यावतीने दररोज ५० लीटरपर्यंत डिझेल मोफत देण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात इटकरे (ता. वाळवा) येथील रिलायन्स पेट्रोल पंपावर करण्यात आली.

रिलायन्स बी.पी. मोबिलिटी कंपनीच्यावतीने संचालक नीलेश जाधव यांनी याबाबतचे पत्र पालकमंत्री जयंत पाटील यांना दिले. सांगली जिल्ह्यातील रिलायन्सच्या सर्व पेट्रोल पंपावर हा उपक्रम राबविण्यात येणार असून जिल्हा प्रशासन अथवा जिल्हाआरोग्य अधिकारी कार्यालयाचे पत्र घेऊन येणाऱ्या नोंदणीकृत खासगी अथवा सरकारी रुग्णवाहिका व ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना याचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती संचालक नीलेश जाधव यांनी दिली. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, वाळवा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संग्राम दिलीपराव पाटील, नितीन जाधव, निशांत जाधव उपस्थित होते.

Web Title: Free diesel facility on behalf of Reliance for ambulances, oxygen vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.