पूरबाधित 74 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 03:33 PM2019-09-02T15:33:00+5:302019-09-02T15:33:33+5:30

सांगली शहरासह जिल्ह्यातील 74 हजार 29 कुटुंबांना 30 ऑगस्ट अखेर एकूण 7402.9 क्विंटल गहू व 7402.9 क्विंटल तांदूळ मोफत वाटप करण्यात आले असून उर्वरीत पूरबाधितांना मोफत धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.

Free grain distribution to over 74,000 families flooded | पूरबाधित 74 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप

पूरबाधित 74 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप

Next
ठळक मुद्देपूरबाधित 74 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटपजिल्ह्यात 4 1कोटी 51 लाख 75 हजार सानुग्रह अनुदान वितरीत

सांगली : सांगली शहरासह जिल्ह्यातील 74 हजार 29 कुटुंबांना 30 ऑगस्ट अखेर एकूण 7402.9 क्विंटल गहू व 7402.9 क्विंटल तांदूळ मोफत वाटप करण्यात आले असून उर्वरीत पूरबाधितांना मोफत धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.

सांगली शहरासह जिल्ह्यातील पलूस, वाळवा, मिरज व शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने पुरामुळे सुमारे 104 गावे बाधित झाली. मदत व पुनर्वसनासाठी पूरपश्चात उपाययोजना अत्यंत गतीने सुरू आहेत.

तसेच एकूण 58 हजार 824 इतक्या बाधित कुटूबांना 5 लिटर प्रमाणे 2 लाख 94 हजार 120 लिटर केरोसीन वाटप करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली.

जिल्ह्यात 4 1कोटी 51 लाख 75 हजार सानुग्रह अनुदान वितरीत

 पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार या प्रमाणे 83 हजार 35 कुटुंबाना 41 कोटी 51 लाख 75 हजार इतके सानुग्रह अनुदान रोखीने वाटप करण्यात आले आहे. तर 5 हजार रूपये वजा जाता उर्वरित 15 कोटी 79 लाख 60 हजार रूपयांची रक्कम धनादेशाव्दारे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

सांगली शहरासह जिल्ह्यातील 104 गावांना महापुराचा मोठ्याप्रमाणावर फटका बसला आहे. लोकांना तात्काळ मदत म्हणून सानुग्रह अनुदान शहरी भागात 15 हजार तर ग्रामीण भागात 10 हजार या प्रमाणे वितरित करण्यात येत आहे. यातील 5 हजार रुपये रोखीने तर उर्वरित रक्कम बँकेत धनादेशाद्वारे जमा करण्यात येत आहे.

जिल्ह्यात 30 ऑगस्ट अखेर ग्रामीण भागातील 45 हजार 195 कुटूंबे व शहरी भागातील 42 हजार 646 कुटूंबे बाधित झाली होती. त्यापैकी ग्रामीण भागातील 43 हजार 490 व शहरी भागातील 39 हजार 545 कुटूंबांना 5 हजार रूपये या प्रमाणे रोखीने रक्कम वितरीत करण्यात आली आहे. तर ग्रामीण भागातील 26 हजार 262 व शहरी भागातील 2 हजार 665 अशा एकूण 28 हजार 927 अनुदान 15 कोटी 79 लाख 60 इतके अनुदान बँकेत जमा करण्यात आले आहे.

यामध्ये मिरज तालुक्यातील 20 पुरामुळे बाधीत झाले असून यातील ग्रामीण भागातील 13 हजार 624 तर शहरी भागाती 39 हजार 530 कुटुंबाना 26 कोटी 57 लाख 70 हजार रोखीने तर ग्रामीण भागातील 7 हजार 405 व शहरी भागातील 2 हजार 650 कुटुंबाना 6 कोटी 35 लाख 25 हजार रुपये बँकेत धनादेशाद्वारे जमा करण्यात आले आहेत.

वाळवा इस्लामपूर तालुक्यातील 38 गावे पुरामुळे बाधित झाली आहेत. यामध्ये 12 हजार 842 कुटुंबाना 6 कोटी 42 लाख 10 रुपये रोखीने तर 9 हजार 579 कुटुंबाना 4 कोटी 78 लाख 95 हजार धनादेशाद्वारे वाटप करण्यात आले आहे.

शिराळा तालुक्यातील 21 गावे पुरामुळे बाधित असून 613 कुटुंबाना 30 लाख 65 रोखीने तर 612 कुटुंबाना 30 लाख 60 हजार इतकी रक्कम बँकेत धनादेशाद्वारे जमा करण्यात आले आहे.

पलूस तालुक्यातील 25 गावे पुरामुळे बाधित असून 16 हजार 411 ग्रामीण तर 15 शहरी कुटुंबांना 8 कोटी 21 लाख 30 हजार रोखीने आणि 8 हजार 666 ग्रामीण व 15 शहरी कुटुंबाना 4 कोटी 34 लाख 80 हजार इतकी रक्कम धनादेशाद्वारे वितरित करण्यात आली आहे.








 

Web Title: Free grain distribution to over 74,000 families flooded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.