वांगीत गरीब रुग्णांना मोफत औषधे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:26 AM2021-01-08T05:26:28+5:302021-01-08T05:26:28+5:30
वांगी : वांगी (ता. कडेगाव) ग्रामपंचायतीने डॉ. पतंगराव कदम ग्राम आरोग्य संजीवनी योजना ८ जानेवारी रोजी डॉ. पतंगराव कदम ...
वांगी : वांगी (ता. कडेगाव) ग्रामपंचायतीने डॉ. पतंगराव कदम ग्राम आरोग्य संजीवनी योजना ८ जानेवारी रोजी डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंती दिवशी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील गरीब व गरजू ग्रामस्थांना यातून मोफत औषध देण्याचा निर्णय घेतला आहे.
वांगी हे गाव तालुक्यातील सर्वांत जास्त लोकसंख्या असणारे गाव आहे. गावची लोकसंख्या सुमारे १५ हजार आहे. या गावात ताकारी योजनेमुळे आर्थिक समृद्धी आली असली तरी काही काही कुटुंबे मोलमजुरी करणारी आहेत. आर्थिक परस्थितीमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब असणारे रुग्ण पैशामुळे औषधे घेत नाहीत. ही औषधे नियमित घ्यायची असल्याने याचा खर्च मोठा आहे. त्यामुळे वांगी ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ. विजय होनमाने व सर्व सदस्यांनी धाडसी निर्णय घेत गावातील सर्व गरजू रुग्णांना ८ जानेवारीपासून वरील आजारावर मोफत औषध देणार असून, ही योजना कायम चालू राहणार असल्याचे सरपंच विजय होनमाने यांनी सांगितले.