शिराळा नगरपंचायतीतर्फे दिव्यांग व्यक्तींना लसीकरणासाठी मोफत रिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:19 AM2021-07-18T04:19:23+5:302021-07-18T04:19:23+5:30

ओळ : शिराळा येथे नगरपंचायतीमार्फत दिव्यांग नागरिकांच्या लसीकरणासाठी मोफत रिक्षाची सोय करण्यात आली होती. लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : ...

Free rickshaw for vaccination of disabled persons by Shirala Nagar Panchayat | शिराळा नगरपंचायतीतर्फे दिव्यांग व्यक्तींना लसीकरणासाठी मोफत रिक्षा

शिराळा नगरपंचायतीतर्फे दिव्यांग व्यक्तींना लसीकरणासाठी मोफत रिक्षा

googlenewsNext

ओळ : शिराळा येथे नगरपंचायतीमार्फत दिव्यांग नागरिकांच्या लसीकरणासाठी मोफत रिक्षाची सोय करण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : शिराळा शहरातील दिव्यांग बांधवांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात राखीव दिवस ठेवण्यात आला होता. यासाठी नगरपंचायतीमार्फत दिव्यांग नागरिकांना घरापासून उपजिल्हा रुग्णालयापर्यंत मोफत रिक्षाची सोय करण्यात आली होती. शनिवारी ४० दिव्यांग नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

मुख्याधिकारी योगेश पाटील म्हणाले, ‘‘दिव्यांग बांधवांना काेविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी नगरपंचायतमार्फत मोफत रिक्षा उपलब्ध करून देण्यात आली होती. यासाठी नगरपंचायतचे कर्मचारी नितीन कुरणे, लक्ष्मण मलमे, अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. अजूनही काही दिव्यांग नागरिकांचे लसीकरण झालेले नाही. त्यांच्यासाठीही मोफत रिक्षा सेवा देण्यात येणार आहे.’’

Web Title: Free rickshaw for vaccination of disabled persons by Shirala Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.