ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:10 PM2019-01-28T23:10:03+5:302019-01-28T23:10:08+5:30
सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थेचा कणा असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असणाºया कर्मचाºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे कर्मचाºयांना किमान ...
सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थेचा कणा असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असणाºया कर्मचाºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे कर्मचाºयांना किमान वेतन लागू करावे, पगारामधील त्रुटी दूर कराव्यात यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.
जिल्हाभरातील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरुन जात कर्मचाºयांनी जिल्हा परिषदेसमोर जोरदार घोषणाबाजी केली.
आयटकचे रमेश सहस्रबुध्दे म्हणाले, प्रशासनाकडे वारंवार विनंती करूनही कर्मचाºयांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे कर्मचाºयांत अस्वस्थता आहे. भविष्य निर्वाह निधीच्या रकमेतही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही.
यावेळी संघटनेच्या इतर पदाधिकाºयांनीही मनोगत व्यक्त करत, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. शिष्टमंडळाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यात किमान वेतनची अंमलबजावणी करा, पगारातील गैरसमज काढण्यासाठी बैठक बोलवावी, भविष्य निर्वाह निधी न भरणाºयांवर गुन्हे दाखल करावेत, सेवा पुस्तके अद्ययावतपणे भरून द्यावीत, कर्मचाºयांना ओळखपत्र मिळावीत, कर्मचाºयांचा वर्ग तीन व चारमध्ये समावेश करावा, वेतनासाठी शंभर टक्के अनुदान मिळावे, निवृत्तीवेतन योजना लागू करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब झुरे, सचिव अॅड. राहुल जाधव, ए. के. कुलकर्णी, यल्लाप्पा कोळी, किरण आरते, संतोष मुळीक, पांडुरंग पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.