पलूस कोविड रुग्णालयात फळेवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:25 AM2021-05-24T04:25:17+5:302021-05-24T04:25:17+5:30

—————————- भाजीसाठी गर्दी सांगली : सध्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. होलसेल व्यापाऱ्यांना शनिवारअखेर ठराविक वेळेत दुकाने उघडण्यास परवानगी ...

Fruit distribution at Palus Covid Hospital | पलूस कोविड रुग्णालयात फळेवाटप

पलूस कोविड रुग्णालयात फळेवाटप

Next

—————————-

भाजीसाठी गर्दी

सांगली : सध्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. होलसेल व्यापाऱ्यांना शनिवारअखेर ठराविक वेळेत दुकाने उघडण्यास परवानगी होती; पण याबरोबर भाजी विक्रेतेही मैदानात उतरले असून, सकाळ सत्रात भाजी खरेदीसाठी झुंबड उडते. वाढत्या रुग्णसंख्येत हा प्रकार धोकादायक ठरत आहे.

——————————————-

चेस प्राइड क्लबतर्फे ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

सांगली : सांगली चेस प्राइड क्लब, न्यूयॉर्कतर्फे मोफत ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेस सांगलीमधील पुरोहित चेस अकॅडमीचे सहकार्य प्राप्त होणार आहे, अशी माहिती बुद्धिबळ प्रशिक्षक श्रेयस विवेक पुरोहित यांनी दिली. ही स्पर्धा खुल्या स्वरूपाची असून, एकूण ११ फेऱ्या घेतल्या जातील.

—————————————

भिलवडीत वादळी वारे, पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

भिलवडी : भिलवडी व परिसरामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकरी वर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या केळी, पपई पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या केळी व पपईच्या बागा जमीनदोस्त झालेल्या आहेत. हातातोंडाशी आलेले केळीचे पीक मुळासकट उपटून पडल्यामुळे शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

————-

गैरवर्तणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी : गायकवाड

सांगली : सध्या सुरू असलेल्या बिकट परिस्थितीत काही लोक डॉक्टर व पोलिसांशी गैरवर्तन करून त्यांच्यावर हल्ले करीत आहेत. ही बाब दुर्दैवी असून, निषेधार्ह आहे. अशा बेकायदेशीर वर्तणूक करणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा सरकारने उगारावा, अशी मागणी शशिकांत गायकवाड यांनी केली आहे.

——————————-

संख येथे आशा वर्कर्सना आरोग्य साहित्य वाटप

संख : संख ग्रामपंचायतीच्या वतीने १५ व्या वित्त आयोगमधून संख येथील ११ आशा वर्कर्सना आरोग्य साहित्याचे वाटप सरपंच मंगलताई पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर कोळी, माजी उपसरपंच एम.आर. जिगजेणी, ग्रामविकास अधिकारी के.डी. नरळे यांच्या हस्ते करण्यात आले.

—————————

जतमध्ये वाळू उपसा

संख : जत तालुक्यातील पांढरेवाडी येथे बोर नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन वाहनांवर महसूल विभागाने कारवाई करून वाहने संख अपर तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आली आहेत. पूर्व भागातील बोर नदीचे पात्र ६४ किलोमीटर अंतर इतके आहे. बोर नदी वाळूतस्करीचे केंद्र आहे. यामुळे नदीपात्रालगतच्या शेतकऱ्यांचे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. पाण्याची पातळी खालवली आहे.

Web Title: Fruit distribution at Palus Covid Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.