लॉकडाऊनमध्ये फळांचे दर वाढतेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:28 AM2021-04-20T04:28:04+5:302021-04-20T04:28:04+5:30
सांगलीत रस्त्यांची दुरुस्ती रेंगाळली सांगली : ड्रेनेजमुळे खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती रेंगाळली आहे. सांगलीच्या वसंतदादा कारखाना, शांतिनिकेतन, पंचशीलनगर, शिवोदयनगर, लक्ष्मीनगर ...
सांगलीत रस्त्यांची दुरुस्ती रेंगाळली
सांगली : ड्रेनेजमुळे खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती रेंगाळली आहे. सांगलीच्या वसंतदादा कारखाना, शांतिनिकेतन, पंचशीलनगर, शिवोदयनगर, लक्ष्मीनगर या परिसरात मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी ड्रेनेजचे काम पूर्ण झाले असले, तरी रस्ते दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. मातीचे व मुरुमाचे ढीग या रस्त्यांवर दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांतून महापालिका कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्याचे कमाल तापमान स्थिर
सांगली : जिल्ह्याचे कमाल व किमान तापमान गेल्या दोन दिवसांपासून स्थिर आहे. साेमवारी कमाल तापमान ३८ तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. तापमानात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. भारतीय हवामान खात्याच्या निरीक्षणानुसार येत्या आठवडाभरात कमाल तापमान ४० अंशावर जाणार आहे. किमान तापमान मात्र २३ ते २४ अंशाच्या घरात राहण्याची शक्यता आहे.