आॅईल डेपो परिसरात इंधन तस्करी जोमात : मिरजेत रेल्वे वॅगनमधून इंधनाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:44 PM2019-01-31T23:44:41+5:302019-01-31T23:45:49+5:30
मिरज रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या इंधन कंपन्यांच्या डेपोतून इंधन तस्करी जोमात सुरू आहे. चार दिवसांपूर्वी रेल्वे वॅगनमधून आलेले हजारो लिटर डिझेल, पेट्रोल गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. रेल्वे वॅगनमधून एका इंधन कंपनीचे
मिरज : मिरज रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या इंधन कंपन्यांच्या डेपोतून इंधन तस्करी जोमात सुरू आहे. चार दिवसांपूर्वी रेल्वे वॅगनमधून आलेले हजारो लिटर डिझेल, पेट्रोल गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. रेल्वे वॅगनमधून एका इंधन कंपनीचे रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात पेट्रोल, डिझेल लंपास झाल्याने कंपनीला आर्थिक फटका बसला आहे.
मिरजेतील आॅईल कंपन्यांच्या इंधन डेपोतून सांगलीसह पाच जिल्ह्यातील पेट्रोल पंपांना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा करण्यात येतो. रेल्वे वॅगनमधून इंधन येत असल्याने स्थानकाशेजारी असलेल्या आॅईल डेपोत इंधन उतरविण्यासाठी स्वतंत्र वाहिन्या आहेत. मात्र, या वाहिन्यांतून इंधनाची गळती सुरू आहे. डेपो परिसरात इंधन तस्करी करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. प्लॅस्टिक पिशव्या व कॅनमधून आॅईल डेपोच्या पाईपमधून व वॅगनमधून रात्रीच्यावेळी इंधन चोरीचे प्रकार सुरू आहेत.
याकडे रेल्वे सुरक्षा यंत्रणा व पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने इंधन तस्करांचे फावले आहे. रविवारी मानमाड येथून मिरजेला इंधन घेऊन आलेल्या रेल्वे वॅगनमधील हजारो लिटर इंधन कमी असल्याचे निदर्शनास आले. यामुळे खळबळ उडाली आहे. आॅईल डेपो परिसरात इंधन तस्करी नेहमीचीच आहे. मात्र तस्करांनी हजारो लिटर इंधन गायब केल्याने इंधनाच्या भरपाईसाठी व प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी डेपो अधिकाºयांची धावपळ सुरू असल्याची माहिती मिळाली.
इंधन चोरट्यांचे रेल्वे सुरक्षा दलासमोर आव्हान
रेल्वेस्थानकालगत आॅईल डेपो परिसरात इंधन तस्करी करणाºया तीन टोळ्या आहेत. तस्कर रेल्वे सुरक्षा यंत्रणेतील कर्मचाºयांच्या संगनमताने रेल्वे टँकरचे सील तोडून इंधन काढतात. इंधन तस्करी प्रकरणात सापडलेल्या एका पोलीस हवालदारास अटक व निलंबनाची कारवाई झाली होती. इंधन तस्करी रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी मिरजेत येऊन पाहणी व उपाययोजना सुचविल्या आहेत. इंधन तस्करीतून दररोज लाखो रुपयांची उलाढाल सुरू असून, इंधन तस्करांना प्रतिबंध करणे अद्याप शक्य झालेले नाही.