खानापूर नगरपंचायतीसाठी तीन कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:21 AM2021-01-09T04:21:30+5:302021-01-09T04:21:30+5:30
ते म्हणाले, राज्यातील नगरपालिकांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी देण्यात येत असलेल्या विशेष अनुदान योजनेतून खानापूर नगरपंचायत प्रशासकीय इमारत बांधणीसाठी दोन कोटी ...
ते म्हणाले, राज्यातील नगरपालिकांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी देण्यात येत असलेल्या विशेष अनुदान योजनेतून खानापूर नगरपंचायत प्रशासकीय इमारत बांधणीसाठी दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामुळे खानापूर नगरपंचायतीच्या नूतन अद्यायवत इमारतीचे काम लवकरच सुरू करणार आहे.
मुस्लिम समाजातील आत्तार-तांबोळी दफनभूमीस सोयीसुविधा करण्यासाठी पंचवीस लाख, तर लिंगायत तेली व वाणी समाजासाठीच्या दफनभूमीत सोयीसुविधा करण्यासाठी पंचवीस लाख, कुंभार समाजासाठीच्या दफनभूमीस सोयीसुविधा करण्यासाठी पंचवीस लाख व माळी समाजासाठी दफनभूमीस सोयीसुविधा करण्यासाठी पंचवीस लाख रुपये मंजूर झाले आहेत. मंजूर झालेली तीन कोटी रुपयांची कामे त्वरित सुरू करून उत्कृष्ट प्रतीची करणार असल्याची माहिती सुहास शिंदे यांनी दिली.
यावेळी उपनगराध्यक्ष ज्ञानदेव बाबर, नगराध्यक्ष तुषार मंडले, नगरसेवक उमेश धेंडे, भारत सरगर, रायसिंग मंडले, बबन माने, राजेंद्र टिंगरे, बिटू टिंगरे, गंगाराम भगत, धनाजी कदम उपस्थित होते.