बुधगावच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास ५४ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:18 AM2021-01-01T04:18:21+5:302021-01-01T04:18:21+5:30
बुधगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ चा असून बिसूर, माधवनगर व परिसरातील जनावरांच्या उपचारासाठीही सोय आहे. मात्र ...
बुधगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ चा असून बिसूर, माधवनगर व परिसरातील जनावरांच्या उपचारासाठीही सोय आहे. मात्र या दवाखान्याची दुरवस्था झाल्याने तो जनावरांच्या उपचारासाठी गैरसोयीचा ठरला होता. गेल्या चाळीस वर्षांपासून तो दुरूस्तीच्यादृष्टीने दुर्लक्षित होता. बुधगाव येथील मिरज पंचायत समितीचे सदस्य विक्रम पाटील यांनी शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन दवाखान्याच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घेतला. शासनाकडे निधीसाठी प्रस्तावही पाठविला. पाटील यांनी सलग दोन वर्षे खासदार संजय पाटील व आमदार सुधीर गाडगीळ यांच्या माध्यमातून रुग्णालय दुरुस्तीकरिता भरीव निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले आहे.
जिल्हा नियोजनमधून दवाखाना दुरुस्तीसाठी ५४ लाख ४१ हजार १४ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून विविध सुविधा उपलब्ध करुन दवाखान्याचे रुपडे बदलणार आहे. निधी मंजुरीसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजीराव डोंगरे, भाजपा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, मनोहर पाटील, संभाजी पाटील, अभिजित गावडे व पशुवैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभले.