काेराेनाबाधित हिंदू भगिनीचा हिंदू बांधवांकडून अंत्यविधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:26 AM2021-05-06T04:26:49+5:302021-05-06T04:26:49+5:30
कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार हे एक दिव्यच ठरत आहे. अशा स्थितीत जमियत उलेमा-ए-हिंद आणि मदनी ट्रस्टने सामाजिक बांधीलकी ...
कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार हे एक दिव्यच ठरत आहे. अशा स्थितीत जमियत उलेमा-ए-हिंद आणि मदनी ट्रस्टने सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. कोणत्याही जात, धर्माची व्यक्ती कोरोनाने मृत झाल्यानंतर अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाल्यास दफनविधी अथवा अंत्यसंस्कार करण्यासाठी ‘जमियत’ व मदनी चॅरिटेबल ट्रस्ट पुढाकार घेत आहे.
चार दिवसांपूर्वी एका महिलेचा क्रीडासंकुल येथील कोरोना सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतदेह गावी आणू नका, तिकडेच अंत्यसंस्कार करा, असा निरोप गावातून आला. पण मृत महिलेच्या सुनेच्या मदतीस कोणीच आले नाही. याची माहिती मिळताच जमियत उलेमा-ए-हिंद आणि मदनी ट्रस्टने मृत हिंदू महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला. संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, महासचिव सुफियान पठाण, ॲड. असिफ अत्तार, सलमान शेख यांनी कोरोना सेंटरमध्ये जाऊन मृतदेह ताब्यात घेतला व पंढरपुर रस्त्यावरील स्मशानभूमीत हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार पार पाडले.