Maharashtra Vidhan Sabha 2019: तेवीस लाखांवर मतदारांच्या हाती जिल्ह्यातील आमदारांचे भवितव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 05:25 PM2019-09-23T17:25:01+5:302019-09-23T17:32:23+5:30

विधानसभा निवडणुकीच्या प्रशासकीय पातळीवरील तयारीने चांगलाच वेग घेतला आहे. शनिवार (२१) रोजी आचारसंहिता लागू झाल्याने विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकांचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील ८ मतदारसंघात २३ लाख ७४ हजार ३७४ मतदार आपला आमदार ठरविणार आहेत. २०१४ च्या निवडणुकीपेक्षा दीड लाखांवर मतदारसंख्येत वाढ झालेली आहे.

The future of the MLAs in the district in the hands of the electorate of twenty three lakhs | Maharashtra Vidhan Sabha 2019: तेवीस लाखांवर मतदारांच्या हाती जिल्ह्यातील आमदारांचे भवितव्य

Maharashtra Vidhan Sabha 2019: तेवीस लाखांवर मतदारांच्या हाती जिल्ह्यातील आमदारांचे भवितव्य

Next
ठळक मुद्देतेवीस लाखांवर मतदारांच्या हाती जिल्ह्यातील आमदारांचे भवितव्यलोकसभेपेक्षा विधानसभेला १0 हजाराने मतदारसंख्या वाढली

शरद जाधव 

सांगली : विधानसभा निवडणुकीच्या प्रशासकीय पातळीवरील तयारीने चांगलाच वेग घेतला आहे. शनिवार (२१) रोजी आचारसंहिता लागू झाल्याने विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकांचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील ८ मतदारसंघात २३ लाख ७४ हजार ३७४ मतदार आपला आमदार ठरविणार आहेत. २०१४ च्या निवडणुकीपेक्षा दीड लाखांवर मतदारसंख्येत वाढ झालेली आहे.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच, राजकीय पातळीवर वेगवान घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवरही तयारीने वेग घेतला आहे. शुक्रवारीच आचारसंहिता लागू होण्याची अधिक शक्यता असल्याने गेल्या दोन दिवसांपासून बैठकांवर बैठका सुरू आहेत. या निवडणुकीसाठी प्रांताधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणार असल्याने त्या पातळीवरच अधिक तयारी सुरू आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात २२ लाख १६ हजार ६०३ मतदार होते. यात वाढ होत आता २३ लाख ७४ हजार ३७४ मतदार आहेत. जिल्ह्यात विधानसभेसाठी २४०५ मतदार केंद्रे आहेत. लोकसभेपेक्षा विधानसभेला १0 हजाराने मतदारसंख्या वाढली आहे.

Web Title: The future of the MLAs in the district in the hands of the electorate of twenty three lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.