गाडगीळ यांच्याकडून महापालिकेस रुग्णवाहिका प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:11 AM2021-05-04T04:11:33+5:302021-05-04T04:11:33+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सांगली : आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी स्थानिक विकास निधीतून महापालिकेला रुग्णवाहिका प्रदान केली. ही रुग्णवाहिका कुपवाड ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी स्थानिक विकास निधीतून महापालिकेला रुग्णवाहिका प्रदान केली. ही रुग्णवाहिका कुपवाड विभागाला देण्यात आली आहे. गाडगीळ यांनी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे रुग्णवाहिकेची चावी सुपुर्द केली.
सध्या सर्वत्र कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. काही वेळा रुग्णांना दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. हीच गरज ओळखून आ. गाडगीळ यांनी महापालिकेला आणि सांगलीच्या शासकीय रुग्णालयाला रुग्णवाहिका देण्याचा निर्णय घेतला.
रुग्णवाहिका प्रदान करते वेळी आ. गाडगीळ म्हणाले, सध्या अनेकांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. त्यामुळे माझ्या फंडातून २ रुग्णवाहिका घेण्यात आल्या आहेत. त्यातील १ कुपवाड विभागाला देण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयालासुद्धा लवकरच रुग्णवाहिका प्रदान करण्यात येईल.
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, महापालिकेला योग्यवेळी मिळालेली ही योग्य मदत आहे. दोन्ही आमदारांनी आमदार निधीतून महापालिकेला वेळोवेळी मदत केली आहे.
यावेळी प्रकाश बिरजे, शेखर इनामदार, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, नगरसेवक धीरज सूर्यवंशी, संजय कुलकर्णी, गजानन मगदुम, अशरफ वांकर, सुजित राऊत, विश्वजित पाटील, गणपती साळुंखे, अमित गडदे आदी उपस्थित होते.