अडचणी सोडविण्यासाठी गलाई बांधवांनी एकत्र यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:37 AM2020-12-30T04:37:07+5:302020-12-30T04:37:07+5:30
गलाई व्यावसायिक विशाल साळुंखे यांनी आयोजित केलेल्या गलाई व्यावसायिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास ...
गलाई व्यावसायिक विशाल साळुंखे यांनी आयोजित केलेल्या गलाई व्यावसायिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, प्रदीप पाटील, पांडुरंग मुळीक, भीमराव साळुंखे, गोरख गायकवाड उपस्थित होते.
डॉ. मोटे म्हणाले, गलाई बांधवांनी शिक्षण नसतानाही देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन तेथील भाषा, संस्कृती आत्मसात केली आहे. आता अशिक्षित राहण्याचे दिवस संपले असून, उत्तर भारतातील राज्यांप्रमाणे हायटेक शिक्षणाची गरज आहे. सीबीएससी पॅटर्नच्या शिक्षणासाठी साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. या भागात लवकरच मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार असून, गलाई व्यावसायिकांचे मोठे योगदान यात मिळाले आहे.
मेळाव्यास लक्ष्मण जाधव, विनायक मासाळ, वसंत रजपूत, धनाजी जाधव, रावसाहेब जाधव, सागर जाधव, गणेश गायकवाड उपस्थित होते.