‘गेम’ होणारा तरुण चौकशीसाठी ताब्यात

By admin | Published: May 8, 2016 12:24 AM2016-05-08T00:24:08+5:302016-05-08T00:24:08+5:30

चौघे फरारीच : वरिष्ठांनी माहिती घेतली

The 'game' is in possession of the young investigators | ‘गेम’ होणारा तरुण चौकशीसाठी ताब्यात

‘गेम’ होणारा तरुण चौकशीसाठी ताब्यात

Next

सांगली : महाविद्यालयीन भांडणातून ‘गेम’ होणाऱ्या संजयनगरमधील कोळेकर या तरुणास शहर पोलिसांनी शनिवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दिवसभर त्याची चौकशी सुरु होती. दरम्यान, याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख कृष्णकांत उपाध्याय यांनी तपास काय सुरु आहे, याची माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दोन दिवसांपूर्वी हरिपूर (ता. मिरज) येथील स्मशानभूमीत १२ तरुण हातात कोयते, चॉपर व चाकू घेऊन बसले असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने याठिकाणी छापा टाकला होता. या छाप्यात ऋषिकेश पाटील, सुशांत कांबळे, शुभम देवके, निरंजन घोडके, रोहित पाटील, आकाश कोरवी, शुभम काबुगडे व मोबीन माणगावकर या आठजणांना पकडण्यात यश आले होते; तर सुमित घाडगे, झुल्फगिरी (पूर्ण नाव नाही), तौफिक मुल्ला व कुणाल माने यांनी पलायन केले होते. संशयितांकडून तीन कोयत्यांसह, चॉपर, चाकू अशी शस्त्रे जप्त केली होती. भांडणातून संशयितांनी बॉबी ऊर्फ बबली व कोळेकर या दोघांची ‘गेम’ करण्याचा बेत आखला होता. मात्र तत्पूर्वीच त्यांना पकडले होते. (प्रतिनिधी)
वादाची चौकशी सुरु
नेमका वाद काय आहे, याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी शनिवारी कोळेकरला ताब्यात घेतले होते. दिवसभर त्याची चौकशी सुरु होती. नेमका वाद कशामुळे याबाबत पोलिसांनी मात्र कोणतीही माहिती दिली नाही.

Web Title: The 'game' is in possession of the young investigators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.