गहाणवट सोन्याची परस्पर विक्री करून गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:23 AM2020-12-08T04:23:41+5:302020-12-08T04:23:41+5:30

सांगली : सोने गहाण ठेवून व्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड करूनही व्याजाची रक्कम दिली नसल्याच्या कारणावरून परस्पर सोने विकण्यात आल्याचा ...

Ganda by mutual sale of mortgaged gold | गहाणवट सोन्याची परस्पर विक्री करून गंडा

गहाणवट सोन्याची परस्पर विक्री करून गंडा

googlenewsNext

सांगली : सोने गहाण ठेवून व्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड करूनही व्याजाची रक्कम दिली नसल्याच्या कारणावरून परस्पर सोने विकण्यात आल्याचा प्रकार सांगलीत घडला. याप्रकरणी रमेश बाबूराव काळे (रा. वृंदावन व्हिला, विश्रामबाग, सांगली) यांनी सावकार ऊर्फ राजेंद्र गणपती शिराळे, अमोल राजेंद्र शिराळे, अमित राजेंद्र शिराळे (सर्व रा. सराफ कट्टा, सांगली) यांच्याविरोधात शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी रमेश काळे यांनी संशयित शिराळे यांच्याकडे ३४५ ग्रॅम सोने गहाण ठेवून दरसाल दरशेकडा १५ टक्के व्याजाने २ लाख ६५ हजार रुपये घेतले होते. त्यानंतर काळे यांनी ७ लाख ६४ हजार ९०९ रुपयांची व्याजाची रक्कम परत केली होती. त्यानंतरही १५ टक्के व्याजाची रक्कम मागण्यात येत होती व ती देण्यास काळे यांनी असमर्थता दर्शवली होती. त्यानंतर संशयितांनी काळे यांना दमदाटी करत गहाण ठेवलेले सोने परस्पर विकून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. २० मे २०१४ ते २० ऑक्टोबर २०२० या कालावधित हा प्रकार घडला. त्यानुसार शिराळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Ganda by mutual sale of mortgaged gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.