गणेश मंडळांना २०० ते हजार टक्के करवाढीचा दणका; महापालिकेबद्दल संताप
By अविनाश कोळी | Published: August 28, 2022 01:43 PM2022-08-28T13:43:37+5:302022-08-28T13:44:17+5:30
सांगली शहर व परिसरात सध्या १ हजार २०० हून अधिक गणेश मंडळे आहेत. या सर्व मंडळांनी मंडप उभारणी केली असून देखावे व सजावटीची तयारी सुरु आहे.
सांगली : सलग तीन वर्षाच्या खंडानंतर यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याचा बेत आखलेल्या गणेश मंडळांना महापालिकेने २०० ते एक हजार टक्के करवाढीचा दणका दिला आहे. त्यामुळे संतापलेल्या मंडळांनी बैठक घेत कर न भरण्याचा निर्णय घेतला.
सांगली शहर व परिसरात सध्या १ हजार २०० हून अधिक गणेश मंडळे आहेत. या सर्व मंडळांनी मंडप उभारणी केली असून देखावे व सजावटीची तयारी सुरु आहे. अशातच महापलिकेकडे परवानगी काढण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना करवाढीची माहिती मिळाली.
करवाढीचा दर ऐकल्यानंतर मंडळांनी संताप व्यक्त केला. जाहिराती, वर्गणीतून कसाबसा उत्सव पार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडळांना महापालिकेने मोठा झटका दिला आहे. मंडळांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने बैठक घेत कर न भरण्याचा निर्णय घेतला आहे.
मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांशी संपर्क साधला, मात्र त्यांनी महापालिकेचा याबाबत ठरावच झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे कर कमी करण्याची बाब आता महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवकांच्या हाती आहे.
असे वाढले दर (रु. प्रति चौरस फूट)
सेवा पूर्वी आता
मंडप १ रु. प्रतिदिन १० रु
कमानी १ रु. प्रतिदिन ५० रु.
प्रति खड्डा २५ रु. ५० रु.