गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपावी : दीपक जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:31 AM2021-09-07T04:31:21+5:302021-09-07T04:31:21+5:30
ऐतवडे बुद्रुक : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गावातील सर्व गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता ‘एक गाव, एक गणपती’ची ...
ऐतवडे बुद्रुक : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गावातील सर्व गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता ‘एक गाव, एक गणपती’ची स्थापना करावी. यंदाचा गणेशोत्सव विधायक उपक्रमांनी साजरा करावा. पूरग्रस्तांना मदत, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, सीसीटीव्ही असे उपक्रम राबविता येतील, असे प्रतिपादन कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दीपक जाधव यांनी केले.
ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांचे पदाधिकारी व स्थानिक प्रशासनाच्या बैठकीत ते बोलत होते. जाधव म्हणाले, मंडळांनी गणेशोत्सवाचा खर्च टाळून गावातील सीसीटीव्हीसह सामाजिक उपक्रमांना मदत करावी. प्रशासनाच्या सूचना व नियम सर्वांनी पाळावेत.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत कुंभार, कुमार गायकवाड, सुरेश पाटील तसेच गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. उपसरपंच अशोक दिंडे यांनी स्वागत केले. पोलीस पाटील संतोषदेव इंगरूळकर यांनी आभार मानले.