सांगलीत महिला पोलिसावर बलात्कार
By admin | Published: January 9, 2015 11:51 PM2015-01-09T23:51:09+5:302015-01-10T00:26:58+5:30
लग्नाचे आमिष : महिला पोलीस पतीचा प्रताप
सांगली : लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने गेल्या चार वर्षांपासून सांगलीतील २५ वर्षीय महिला पोलिसावर बलात्कार केल्याचा प्रकार आज, शुक्रवारी उघडकीस आला. याप्रकरणी रोहन जगदीश शहा (वय २६, रा. इस्लामपूर, सध्या पोलीस वसाहत, विश्रामबाग) या संशयितास अटक करण्यात आली आहे. पीडित महिला पोलिसाला जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केल्याप्रकरणी शहाची पत्नी पौर्णिमा डामसे हिच्या विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौर्णिमा ही सांगली पोलीस दलात कार्यरत आहे.पीडित महिला २००७ मध्ये पोलीस दलात भरती झाली आहे. २००९ मध्ये तिची इस्लामपूर पोलीस ठाण्यात बदली झाली होती. तेथे जानेवारी २०१० मध्ये रोहन शहाशी तिची ओळख झाली. ती इस्लामपुरातच भाड्याने खोली घेऊन राहत होती. हीच संधी साधून रोहनने लग्नाचे आमिष दाखवून इस्लामपुरातच तिच्यावर सातत्याने बलात्कार केला. २०१२ मध्ये तिची सांगलीला पोलीस मुख्यालयात बदली झाली. तरीही तो तिच्या संपर्कात होता. मार्च २०१४ पर्यंत त्याने कोल्हापुरातील ‘मंथन’ लॉजवर, तसेच गणपतीपुळे येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. डिसेंबर २०१४ मध्ये शहा याने पौर्णिमा डामसे या महिला पोलिसाशी विवाह केला. त्यामुळे पीडित महिलेने शहाशी फारकत घेऊन त्याच्याशी असलेले संबंध तोडले होते.
काल, गुरुवारी रात्री नऊ वाजता पीडित महिला ड्युटीवरून चालत विश्रामबाग पोलीस वसाहतीतील घरी निघाली होती. त्यावेळी शहा व त्याची पत्नी पौर्णिमा या दोघांनी मोटारीतून (एमएच ०९ एव्ही ९) येऊन रेल्वे फाटकाजवळ तिला गाठले. मोटारीतून उतरून दोघांनी तिला ‘तुला फार मस्ती आली आहे, चल पोलीस ठाण्यात जाऊया’, असे म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर पुन्हा तिला मोटारीत बसवून जुना कुपवाड रस्त्यावर नेले. तेथेही तिला पुन्हा बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये पीडित महिला जखमी झाली. त्यानंतर उपचारार्थ ती सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाली. तिने शहा व पौर्णिमा डामसे या दोघांविरुद्ध तक्रार केली. या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र डोंगरे यांचे पथक रुग्णालयात दाखल झाले. पीडित महिलेचा जबाब घेऊन शहाविरुद्ध बलात्काराचा, तर त्याची पत्नी पौर्णिमावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. शहाला अटक केली असून न्यायालयाने त्याला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची मोटार जप्त करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
संशयिताचे पोलीस दलाशी संबंध
संशयित शहा नेहमी आलिशान मोटारीतून फिरतो. त्याचे पोलीस दलातील काही महिला पोलीस तरुणींशी मैत्रीचे संबंध असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. पौर्णिमा डामसे हिचा यापूर्वी विवाह झाला आहे. तिला आठ वर्षांचा मुलगा आहे. तिने शहाशी दुसरा विवाह केला आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आज, शुक्रवारी सायंकाळी त्याच्यासह पीडित महिलेची सांगलीच्या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी कुपवाड रस्त्यावर नेले. तेथेही तिला पुन्हा बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये पीडित महिला जखमी झाली. त्यानंतर उपचारार्थ ती सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाली. तिने शहा व पौर्णिमा डामसे या दोघांविरुद्ध तक्रार केली. या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र डोंगरे यांचे पथक रुग्णालयात दाखल झाले. पीडित महिलेचा जबाब घेऊन शहाविरुद्ध बलात्काराचा, तर त्याची पत्नी पौर्णिमावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. शहाला अटक केली असून न्यायालयाने त्याला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची मोटार जप्त करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)