स्क्रॅपमधील चारचाकी विकणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:33 AM2021-02-25T04:33:30+5:302021-02-25T04:33:30+5:30

सांगली : बीएस मानांकनाच्या वाहने वापरास बंदी असल्याने स्क्रॅपमध्ये काढलेल्या मोटारींची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ...

A gang selling four-wheelers in scrap was arrested | स्क्रॅपमधील चारचाकी विकणारी टोळी जेरबंद

स्क्रॅपमधील चारचाकी विकणारी टोळी जेरबंद

Next

सांगली : बीएस मानांकनाच्या वाहने वापरास बंदी असल्याने स्क्रॅपमध्ये काढलेल्या मोटारींची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ३७ लाख ८० हजारांच्या नऊ चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली.

एलसीबीने केलेल्या कारवाईत सचिन रामगोंडावरू (२७, रा. कोंगनोळी), अभय ज्ञानेश्‍वर पवार (३९, रा. चिंचवडेनगर, चिंचवड, ता. मावळ, पुणे), आनम असलम सिद्धीकी (४२, सरदार वल्लभाई पटेल नगर, आरसी मार्ग, माहोल रस्ता, चेंबूर, मुंबई), अशी संशयितांची नावे असून अभिजित सावंत (रा. कोल्हापूर) हा पसार असून त्याचा शोध सुरू आहे.

संशयिताने मिरज-म्हैसाळ रोडवर असलेल्या जुन्या टोलनाक्‍यापुढे पत्र्याच्या शेडमध्ये गाड्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या. शासनाने २०१९ मध्ये बीएस ४ मानांकन असलेल्या वाहनांची विक्री थांबवून त्या स्क्रॅप करण्याचे आदेश दिले होते. या मानांकनाच्या काही गाड्या पनवेल व सांगलीतून आमन सिद्दीकी याने स्क्रॅपसाठी घेतल्या होत्या. मात्र, या गाड्या स्क्रॅप करण्याऐवजी पुराच्या पाण्यात खराब झाल्याचे सांगून दुरूस्त करून कमी किमतीत बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.

चौकट

बोगस नंबरप्लेटचा वापर

पोलीस पथकाने बनावट ग्राहक पाठवून व्यवहार ठरल्यानंतर छापा टाकून वाहने जप्त करण्यात आली आहेत. खरेदीच्या किमतीत तोटा झाल्याने बोगस नंबरप्लेटचा वापर केल्याचेही समोर आले. पुराच्या पाण्यात बुडालेल्या स्क्रॅपमध्ये दिलेल्या गाड्यांची नोंदणी होणार नाही हे माहीत असतानाही विक्रीचा प्रयत्न सुरू होता, अशीही माहिती अधीक्षक गेडाम यांनी दिली.

Web Title: A gang selling four-wheelers in scrap was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.