कागलमध्ये विकास कामांची चोरी करणारी टोळी कार्यरत, हसन मुश्रीफ यांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 12:44 PM2023-02-05T12:44:12+5:302023-02-05T12:44:30+5:30
कागल तालुक्यात विकास कामांची चोरी करणारी टोळीच कार्यरत झाली आहे. कार्यकर्त्यांनी यापासून सावध राहावे असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.
दत्ता पाटील
म्हाकवे
कागल तालुक्यात विकास कामांची चोरी करणारी टोळीच कार्यरत झाली आहे. कार्यकर्त्यांनी यापासून सावध राहावे असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. नियोनबध्द आराखडा तयार करून कागल मतदार संघातील विकासकामे मार्गी लावली असताना केवळ पक्षाची सत्ता आल्याने उद्घाटने करून श्रेय लाटण्याचे उद्योग बंद करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
म्हाकवे तालुका कागल येथे जनजीवन पाणी पुरवठा योजनेतून चार कोटी 84 लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प.स.सदस्य ए.वाय.पाटील-म्हाकवेकर होते.
आमदार मुश्रीफ पुढे म्हणाले, जे साधे ग्रामपंचायत सदस्यही नाहीत त्यांना विकास कामांचे उद्घाटने करून श्रेय घेण्याची घाई झाली आहे. पण गेले ३०वर्षात आपण केलेल्या कामामुळे जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले.
यावेळी रमेश पाटील, सिद्राम गंगाधरेनितीन पाटील, सदाशिव गोरे,सुनील पाटील,जी .एस .पाटील, एच.एन.पाटील, निवास पाटील, आकाराम पाटील, विलास पाटील,विश्वनाथ पाटील,एस.के.पाटील,जीवन कांबळे, विजय पाटील, चंद्रकांत कांबळे,अंजना पाटील, सुजाता कुंभार यासह ग्रामस्थ उपस्थित होते. के आर पाटील यांनी आभार मानले.